google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सामाजिक लढा उभा करताना राजकारणाच्या चौकटीतून बाहेर पडावे लागते : प्रफुल्ल कदम

Breaking News

सामाजिक लढा उभा करताना राजकारणाच्या चौकटीतून बाहेर पडावे लागते : प्रफुल्ल कदम

 सामाजिक लढा उभा करताना राजकारणाच्या चौकटीतून बाहेर पडावे लागते : प्रफुल्ल कदम



 प्रफुल्ल कदम यांचा लक्ष्मीनगर येथे सर्वपक्षीय जंगी सत्कार संपन्न.महिलांनी औक्षण करून प्रफुल्ल कदम यांचे केले स्वागत.प्रफुल्ल कदम यांना  चळवळीत साथ देण्याचा ग्रामस्थांचा मोठा निर्धार

     सांगोला (प्रतिनिधी) राजेवाडी तलावातील हक्काचे मिळणारे पाणी जाणूनबुजन आणि अर्थपूर्ण वाटाघाटी करुन जलसंपदा विभागाच्या काही अधिकाऱ्यांनी लक्ष्मीनगर ता. सांगोला गावाला वंचित ठेवले होते. 

योग्य नियोजनाचा अभाव, प्रशासनावर नसलेले नियंत्रण या कारणामुळे लक्ष्मीनगर गावातील आणि परिसरातील शेतकऱ्यांची उभी पिके पाण्याअभावी जळू लागली होती, 

शेतकरी हवालदिल झाला होता.शेतकऱ्यांनी साद दिली आणि मी लढा उभारला व त्यांच्या हक्काचे पाणी कायदेशीररित्या त्यांना मिळवून दिले. सामाजिक लढा उभा करताना राजकारणाच्या चौकटीतून बाहेर पडावे लागते.

 युवकांनी गावच्या विकासासाठी कधीही आणि कुठेही हाक मारा नक्कीच मी तुम्हाला मदत करण्यास तयार असल्याचे प्रतिपादन किसान आर्मी आणि वॉटर आर्मीचे संस्थापक अध्यक्ष प्रफुल्ल कदम यांनी लक्ष्मीनगर येथे व्यक्त केले. लक्ष्मीनगर ग्रामस्थांच्या वतीने राजेवाडी तलावातील 

पाणी सोडल्याने त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्या सत्काराला उत्तर देताना प्रफुल्ल कदम बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सरपंच दिपक बाड, माजी सरपंच सिध्देश्वर करांडे, धनाजी नरळे,

युवा नेते विजय नरळे, प्रगतिशील शेतकरी विजय खांडेकर, कुंडलिक नरळे, सिध्देश्वर हिप्परकर, सुधिर खांडेकर, अतुल बाड, लक्ष्मण नरळे, अरुण नरळे, राजू बाड, प्रताप नरळे, सचिन धोंडीबा बाड, कुंडलिक बाड आदि मान्यवर उपस्थित होते.

 पिढ्यानपिढ्या आणि हक्कदारीने मिळणारे पाणी जलसंपदा विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे लक्ष्मीनगर येथील शेतकऱ्यांना वंचित रहावे लागले होते. प्रफुल्ल कदम यांनी  पाण्याअभावी जळणाऱ्या पिकांना ऐन संकटात अभ्यासपूर्ण व धाडसी लढा देऊन पाणी दिले.

पाण्याची सध्याची दशा आणि पुढील दिशा याबाबत मार्गदर्शन केले. भविष्यातील पाणी प्रश्न सोडवायचा असेल तर टाटा- कोयना धरणातील समुद्राला वाहून जाणाऱ्या 116 टीएमसी

  पाण्याशिवाय पर्याय नाही,ही भूमिका यावेळी प्रफुल्ल कदम यांनी जनतेसमोर स्पष्ट केली. त्याचबरोबर गावाच्या विकासाचा नवा प्रस्तावही त्यांनी ग्रामस्थांसमोर मांडला. 

या सत्कार सोहळ्यात युवकांना मार्गदर्शन करताना देशातील शूरवीरांची माहिती देत आतापर्यंत केलेल्या सामाजिक चळवळींची अभ्यासपूर्ण माहिती दिली.

       यावेळी गावातील महिलांनी औक्षण करून प्रफुल्ल कदम यांचे स्वागत केले. हलगीच्या निनादात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत त्यांचे स्वागत करण्यात आले.

सदर सत्कार कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार जगन्नाथ साठे  यांनी केले. तर सूत्रसंचालन सिध्देश्वर हिप्परकर यांनी केले. तर आभार सिध्देश्वर करांडे यांनी मानले. यावेळी गावातील आणि परिसरातील शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments