ब्रेकिंग! तुमच्या बाईकची चावी काढण्याचा अधिकार ट्रॅफिक पोलिसांना नाही
सोलापूरसह अन्य भागात वाहतुकीचे नियम कडक करण्यात आले आहेत. ठिकठिकाणी ट्रॅफिक पोलिसांकडून तपासणी मोहीम सुरू आहे.
वाढते अपघात रोखण्यासाठी वाहतूक शाखा अॅक्शनमोडवर आली आहे. दरम्यान, तपासणी करताना ट्रॅफिक पोलीस संबंधित वाहनचालकांच्या गाडीची चावी काढतात.
मात्र, ही प्रक्रिया करण्याचा अधिकार ट्रॅफिक पोलिसांना नाही, असा महत्त्वाचा निकाल सत्र न्यायालयाने दिला आहे. मुंबईतील कुलाबा येथील एन. एस. रोडवरील सिग्नलवर सागर पाठक नावाचा तरुण विनाहेल्मेट बाईक चालवत होता.
ट्रॅफिक पोलीस जवळ येत असल्याचे पाहून त्याने त्वरित हेल्मेट घातले होते. वाहतूक नियम मोडल्याच्या कारणावरुन ट्रॅफिक पोलिसांनी सागरवर दंड वसुलीची कारवाई केली. दरम्यान, सागरने संबंधित ट्रॅफिक पोलिसावर हल्ला केला.
पोलिसाच्या तक्रारीवरुन सागर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला व त्याला अटकही झाली. गेल्या सहा वर्षांपासून संबंधित घटनेचा खटला मुंबई सत्र न्यायालयात चालला नियम मोडणार्या बाईक चालकाने पोलिसांकडे ड्रायव्हिंग लायसन्स जमा
केल्यानंतर पोलीस ठाण्यात नेणे हे अत्यंत बेकायदेशीर कृत्य असल्याचे मत सत्र न्यायाधीश निखिल मेहता यांनी नोंदवले. वाहतुकीचे नियम मोडल्यास इ-चलन, पावती प्रक्रिया अथवा नोंदणी क्रमांकाचे छायाचित्र घेऊन कारवाई केली जाऊ शकते.
त्याचवेळी बाईकस्वाराला पोलीस ठाण्यात येण्यासाठी जबरदस्ती करू शकत नाही. तसेच संबंधित ट्रॅफिक पोलिसांना गाडीची चावी काढण्याचा अजिबात अधिकार नाही, असे आदेश सत्र न्यायालयाने दिले आहे.


0 Comments