दुध दरवाढीबाबत भव्य रास्ता रोकोमध्ये सामील व्हा--डाॅ. भाई बाबासाहेब देशमुख.
भव्य रस्ता रोको डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या उपस्थित चलो सांगोला चलो सांगोला उद्या दिनांक २१ / ६/२०२३ रोजी सकाळी ९.३० ठिकाण सांगोला पंचायत समिती सांगोला व शेतकरी कामगार पक्ष सांगोला ...
दूध दर वाढीबाबत भव्य रास्तारोकोसाठी परवानगी मिळणेबाबत....
सांगोला तालुक्यातील डाळिंब बागा वरील मर रोग आल्याने बहुतांश शेतकरी उपजिविकेसाठी दूध उत्पादनाकडे वळले आहेत. दूध दर कपात केल्यामुळे शेतकरी व दूध व्यवसाय अडचणीत आलेला आहे.
तरी आज रोजी सांगोला तालुक्यात पाण्याची भिषण टंचाई निर्माण झालेली आहे.
जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झालेला असून दूध व्यवसायात सुद्धा प्रचंड अडचणी आल्या आहेत. लाखो रुपये किमतीस खरेदी केलेली जनावरे नाममात्र किमतीमध्ये विकण्याची वेळ आलेली आहे.
अशा परिस्थितीत दूधाचे दर कमी झालेले आहेत व सर्व दूध उत्पादक शेतकन्यांच्या ७/१२ उतान्यावर कर्जाचा बोजा झालेला आहे व त्यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे.
निसर्गाच्या अवकृपा व सरकारची अपुरी मदत यामुळे शेतकरी पुर्णपणे आर्थिक अडचणीत असताना.. शेतकऱ्यांनी आपल्या कुटुंबाच्या उपजीविकेसाठी दुध व्यवसायाकडे आपले लक्ष केंद्रित केले..दुधाचे दर अपेक्षीत आसलेमुळे अनेकांनी नवीन गाई खरेदी केल्या.पऱतु अचानक राज्यसरकाच्या चुकीच्या धोरणामुळे दुधाचे दर कमी झाले..व पुंन्हा शेतकरी --पशुपालक आर्थिक अडचणीत सापडला त्यामुळे राज्यसरकारने दुधाचे दर वाढवण्यासाठी योग्य ती पावले उचलावी व दुध दरवाढ करावी या मागणीसाठी.
बुधवार दिनांक २१/६)२०२३ रोजी सकाळी ९-३० वाजता पंचायत समिती सांगोला येथे शेतकरी कामगार पक्षाच्या व पुरोगामी युवक संघटनेच्या वतीने रस्ता रोको करण्यात येणार
आसलेचे निवेदन डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांनी दिले आहे...तरी सर्वांनी वेळेवर उपस्थित रहावे असे अहवान करण्यात येत आहे
तरी याबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करावा व दुधाच्या दरामध्ये वाढ व्हावी यामागणीसाठी भव्य रास्ता रोकोसाठी परवानगी मिळावी ही विनंती.
रास्तारोकोचे ठिकाण :- सांगोला पंचायत समिती,
दिनांक व वेळ :- दि. २१/०६/२०२३ रोजी सकाळी ९:३० वाजता.
0 Comments