google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोठी बातमी! पोलिस निरीक्षक रणजित माने यांची तडकाफडकी बदली; ' आयपीएस अधिकारी नयोमी साटम कक्षात कामकाज पाहतील

Breaking News

मोठी बातमी! पोलिस निरीक्षक रणजित माने यांची तडकाफडकी बदली; ' आयपीएस अधिकारी नयोमी साटम कक्षात कामकाज पाहतील

 मोठी बातमी! पोलिस निरीक्षक रणजित माने यांची तडकाफडकी बदली; '


आयपीएस अधिकारी नयोमी साटम कक्षात कामकाज पाहतील 

मंगळवेढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजीत माने यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आयपीएस अधिकारी नयोमी साटम या कामकाज पाहणार आहेत.

पोलीस निरीक्षक रणजित माने यांची पुढील आदेशा पर्यंत नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे.

बोरीवलीस्थित (पूर्व), मुळगाव कणकवली वरवडे-फळसेवाडीची कोकणकन्या नयोमी दशरथ साटम यांनी पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले आहे.

त्या दि.9/09/ 2023 पर्यंत मंगळवेढा पोलीस ठाण्याचा स्वतंत्र कारभार संभाळून वेळापत्रकाप्रमाणे प्रशिक्षण पूर्ण करणार आहेत.

ताबडतोब कार्यमुक्त ही केले

पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी आज आदेश काढला आहे . या आदेशामध्ये नमूद केले की, ‘ आर आर बॅच २०२१ मधील श्रीमती. नयोमी दशरथ साटम परिविक्षाधीन भापोसे यांना

 जिल्हा प्रात्यक्षिक प्रशिक्षणाकरीता या कार्यालयाचे संदर्भाांकित आदेश क्र. २ अन्वये सोलापूर ग्रामीण जिल्हयातील जिल्हा प्रात्यक्षिक 

प्रशिक्षण कार्यक्रम (वेळापत्रक दि.३/४/२०२३ ते दि.२३/९/२०२३ या कालावधीकरीता आयोजित करण्यात आला आहे.

संदर्भाकित या कार्यालयाचे आदेश नं. २ अन्वये श्रीमती.नयोमी दशरथ साटम, परिविक्षाधीन भापोसे यांचे दि.१९/६/२०२३ ते दि.०९/९/२०२३ या कालावधीत मंगळवेढा पोलीस ठाणेचा स्वतंत्र कार्यभार पाहतील. 

श्रीमती.नयोमी दशरथ साटम परिविक्षाधीन भापोसे यांचे दि.१९/६/२०२३ ते दि.०९/९/२०२३ या कालावधीत 

मंगळवेढा पोलीस ठाणे येथे स्वतंत्र कार्यभार सांभाळुन वेळापत्रकाप्रमाणे प्रशिक्षण पूर्ण करून पूर्तता अहवाल या कार्यालयास सादर करावा,

पोलीस निरीक्षक रणजित माने हे हे पुढील आदेशापर्यंत नियंत्रण कक्ष येथे हजर राहून कामकाज पाहतील असेही बदलीच्या आदेशात नमूद आहे.

सर्व पक्षीय आंदोलनाला यश

मंगळवेढा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रंणजीत माने यांच्या विरोधात सर्वपक्षीय नेते मंडळी यांनी 

कोल्हापूर येथील विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयापुढे आंदोलन छेडले होते. त्या आंदोलनाला यश आले असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Post a Comment

0 Comments