google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोठी बातमी...!!!भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांच्यावर गोळीबार

Breaking News

मोठी बातमी...!!!भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांच्यावर गोळीबार

 मोठी बातमी...!!!भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांच्यावर गोळीबार



मोठी बातमी....!!! भीम आर्मी तसेच आझाद समाज पार्टीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद रावण यांच्यावर काही वेळापूर्वी गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी सायंकाळी घडली. 

उत्तर प्रदेश येथील सहारनपुर येथे एका कार्यक्रमाला जात असताना देवबंद या ठिकाणी अज्ञातांनी त्यांच्या गाडीवर गोळीबार केला. या गोळीबारात ते किरकोळ जखमी झाले

 असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या समवेत असणाऱ्या एक सहकारी याला देखील गोळी लागल्याचे समजते.घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून या घटनेमुळे खळबळ निर्माण झाली आहे. 

चंद्रशेखर आजाद हे त्यांच्या भाऊ व इतर चार सहकाऱ्यांसोबत सहारनपुर कडे चालले होते. हरियाणा पासिंग नंबरच्या कारमधील अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीच्या दिशेने गोळीबार केला. गोळीबार करून हल्लेखोर सहारनपुरच्या दिशेने पळून गेले. 

घटनेची माहिती चंद्रशेखर यांनी स्वतः वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर तातडीने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती ठीक असून पोलीस तपास सुरू करण्यात आलेला आहे. 

चंद्रशेखर यांच्यावरील अज्ञात इसमांनी केलेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे. रुग्णालयात त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली आहे. पुढील तपास सहारनपुर पोलीस करीत आहेत.

Post a Comment

0 Comments