google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 महाराष्ट्रात 2024 च्या निवडणुकीत एकनाथ शिंदे CM पदाचा चेहरा नाहीत? फडणवीस म्हणाले...

Breaking News

महाराष्ट्रात 2024 च्या निवडणुकीत एकनाथ शिंदे CM पदाचा चेहरा नाहीत? फडणवीस म्हणाले...

 महाराष्ट्रात 2024 च्या निवडणुकीत एकनाथ शिंदे CM पदाचा चेहरा नाहीत? फडणवीस म्हणाले...


आगामी 2024 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्याचा मुख्यमंत्री कोण असेल? असा प्रश्न वारंवार विचारला जातोय. या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा खुलासा केलाय. 

याबाबतचा निर्णय आमच्या पक्षातील वरिष्ठ नेते, म्हणजेच भाजपचे संसदीय मंडळ घेईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. त्यामुळे पुढील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार नाहीत? याविषयी चर्चा रंगल्या आहेत.

एकनाथ शिंदे यांचे नेतृत्वगुणांची ठाम भूमिका मांडणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाच्या पुढील चेहऱ्याबाबत मात्र स्पष्ट बोलणे टाळले. याबाबतचा निर्णय हे वरिष्ठ पातळीवर भाजपचे नेते मंडळी घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

 रिपब्लिक भारत या खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाबाबत केलेल्या विधानामुळे राज्यांमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे.

राज्यात एकिकडे सत्ताधारी शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर तर्क वितर्क लावले जात असताना, दुसरीकडे विरोधकांकडूनही सरकार पडेल असा दावा केला जातोय. त्यातच आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत.

 या निवडणुकीनंतर शिंदे – फडणवीस यांचे सरकार पुन्हा एकदा राज्यात स्थापन होईल का? असा प्रश्न उपस्थित होतोय. उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री पदावर विराजमान होतील का? याविषयी देखील चर्चा सुरू झाल्यात

आगामी विधानसभा निवडणुका या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच लढवल्या जातील, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. मात्र, त्या दाव्या अनुसार एकनाथ शिंदेच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असणे आवश्यक आहे.

 मात्र, असे असताना त्यावेळी जर भाजप पक्षाला वाटले की, वेगळा निर्णय घ्यावा, तर पक्ष वेगळा निर्णय घेऊ शकतो, अशी शक्यता देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित व्यक्त केले आहे. त्यामुळे आता युतीकडून वेगळा निर्णय होण्याची शक्यता देखील वर्तवली जाते

कोण मुख्यमंत्री होणार? याबाबतचा प्रश्न भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनाव विचारायला हवा, असे मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलय.

 भारतीय जनता पक्षामध्ये सर्व निर्णय हे संसदीय समिती घेत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे मुख्यमंत्री कोण असेल याबाबत आपण कोणतेही भाष्य करू शकत नसल्याचे ते म्हणाले.

Post a Comment

0 Comments