भाजपच्या प्रदेश कार्यकारणी निमंत्रित सदस्यपदी अॅड.गजानन भाकरे यांची निवड
सावंत कुटुंबीयांच्या वतीने आमदार सुभाषबापू देशमुख यांच्या हस्ते सत्कार संपन्न
सांगोला: (प्रतिनिधी शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क)
भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यकारिणीच्या निमंत्रित सदस्यपदी माजी नगरसेवक अॅड. गजानन लक्ष्मण भाकरे यांची निवड भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी केली.
त्यानिमित्त माजी नगरसेवक सतीशभाऊ सावंत कुटुंबीयांच्या वतीने राज्याचे माजी सहकार मंत्री आमदार सुभाष बापू देशमुख यांच्या हस्ते अॅड. गजानन भाकरे यांचा फेटा बांधून पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.
माजी नगरसेवक अॅड. गजानन भाकरे हे माजी मंत्री आमदार सुभाषबापू देशमुख यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. यापूर्वी त्यांनी नगरसेवक म्हणून व भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष म्हणूनही अतिशय उत्कृष्ट काम केले आहे.
माजी नगरसेवक अॅड. गजानन भाकरे यांच्या या निवडीनिमित्त आमदार सुभाषबापू देशमुख यांच्या हस्ते माजी नगरसेवक सतीशभाऊ सावंत यांनी सत्कार केला.
यावेळी माजी नगरसेवक सतीशभाऊ सावंत, हाजी हमीद तय्यब खतीब, प्राचार्य सर्फराज खतीब, अॅड. धनंजय लिगाडे, धनाजी महांकाळ यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


0 Comments