सोलापूर जिल्ह्यात खळबळ आस्तीन का सांप! अन्नसुरक्षा
अधिकारी प्रशांत कुचेकर यांच्यावर गुटखा माफिया म्हणून गुन्हा दाखल;
तीर्थक्षेत्र पंढरी नगरीत अन्नसुरक्षा अधिकारी म्हणून काम पाहणारे प्रशांत कुचेकर हे चक्क गुटखा माफियाच्या भूमिकेत दिसून आले आहेत.
सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ येथे अवैध गुटख्याची विक्री करत असल्याचे निदर्शनास आले आहे. सुमारे १ कोटी ४० लाख रुपयांचा गुटखा त्यांच्याकडून जप्त करण्यात आला आहे.
कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून या प्रकाराने सोलापूर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
पंढरपूर शहरात अन्न सुरक्षा अधिकारी म्हणून काम पाहणाऱ्या प्रशांत कुचेकर यांचे दुसरे रूप पुन्हा जगासमोर आले आहे. त्यांनी या अगोदर पंढरपूर तालुका अन्नसुरक्षा अधिकारी म्हणून काम पाहिले होते.
अन्नसुरक्षा अधिकारी म्हणून काम करत असताना, गुटखा माफियांना पकडणे, त्यांचा माल हस्तगत करणे अशा अनेक कारवाया त्यांनी पार पडल्या आहेत.
परंतु जप्त केलेला गुटखा पुन्हा मार्केटमध्ये पाठवून लाखो रुपयांची कमाई करण्याचा त्यांचा मानस या प्रकरणातून पुढे आला आहे.
कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यातील पोलिसांनी त्यांना अवैध गुटखा विक्रीच्या प्रकरणात गोवले आहे. त्यांच्यासोबत इतर चार साथीदारांचाही समावेश
असून त्यांच्यावर भादवी ३२८, १८८, २७३ तसेच अन्नसुरक्षा मानके अधिनियम २००७ अन्वये ५९ नुसार कवठेमंकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची फिर्याद कवठेमहांकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार दीपक गायकवाड यांनी दिली आहे. याप्रकरणी पुढील तपास कवठेमंकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर शहाणे हे करीत आहेत.
प्रशांत कुचेकर यांनी यापूर्वी किती लाखांचा गुटखा विकला ?
पंढरपूरचे अन्नसुरक्षा अधिकारी प्रशांत शशिकांत कुचेकर यांना गुटखा माफियाच्या रूपात कवठेमंकाळ पोलिसांनी
पकडल्यामुळे, प्रशासनावरील नागरिकांचा विश्वास डळमळला आहे. प्रशांत कुचेकर यांनी यापूर्वी किती लाखांचा गुटखा विकला ? त्यांच्याकडे किती संपत्ती आहे ? हे तपासल्यास, त्यांचे खरे रूप समोर येणार आहे.
कवठेमंकाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही व्यापाऱ्यांकडे अवैध गुटख्याचा साठा सापडला आहे. याबाबत त्यांच्याकडे चौकशी केली असता,
त्यांनी हा गुटखा अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत कुचेकर आणि त्यांच्या साथीदारांकडून घेतला असल्याचे सांगितले आहे. अशी माहिती कवठेमंकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर शहाणे यांनी दिली आहे.


0 Comments