google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक.. जत तालुक्यातील माडग्याळ येथे सनमडी-माडग्याळ रस्त्यावर ओढ्यावरील पुलावरून ट्रॅक्टर कोसळल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

Breaking News

धक्कादायक.. जत तालुक्यातील माडग्याळ येथे सनमडी-माडग्याळ रस्त्यावर ओढ्यावरील पुलावरून ट्रॅक्टर कोसळल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

धक्कादायक.. जत तालुक्यातील माडग्याळ येथे सनमडी-माडग्याळ


रस्त्यावर ओढ्यावरील पुलावरून ट्रॅक्टर कोसळल्याने शेतकऱ्याचा मृत्यू 

सांगली:पुलावरून ट्रॅक्टर कोसळून शेतकरी ठार 

सांगली : जत तालुक्यातील माडग्याळ येथे सनमडी-माडग्याळ रस्त्यावर ओढ्यावरील पुलावरून ट्रॅक्टर कोसळल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाला. 

अशोक सन्मुख माळी (वय ४७ रा. माडग्याळ) असे मृताचे नाव आहे. ही घटना सोमवारी सकाळी अकरा वाजता घडली. घटनेची नोंद उमदी पोलिस ठाण्यात झाली आहे.

माडग्याळ येथे अशोक माळी कुटुंबासह राहतात. त्यांनी शेतीमध्ये शेणखत घालण्यासाठी गावातील वस्तीवरील खत विकत घेतले होते. सोमवारी सकाळ पासून ते स्वतः ट्रॅक्टरने खत आणत होते. शेतात खत ओतून ते रिकामा ट्रॅक्टर घेऊन खत आणण्यासाठी निघाले होते.

 गावालगत सनमडी-माडग्याळ रस्त्यावरील ओढ्यात लहान अरुंद पूल आहे. अशोक माळी ट्रॅक्टर घेऊन पुलावर आले असता समोरून येणाऱ्या वाहनाला बाजू देताना

 अचानक पुलावरून ट्रॅक्टर खाली कोसळण्याची घटना घडली. यावेळी ट्रोली पुलाच्या कठड्याला अडकली, तर ट्रॅक्टर ओढ्यात पडला.

या झालेल्या अपघातामध्ये अशोक माळी यांना गंभीर मार लागला होता. त्यांना तत्काळ खासगी रुग्णालयात नेण्यात आले. परंतु त्यांच्या डोक्याला, छातीला जोराचा मार लागल्याने मृत्यू झाला. 

घटनास्थळी उमदी पोलिसांनी पंचनामा केला. मयत अशोक माळी यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील, मुलगा, मुलगी, भाऊ, भावजय, पुतण्या असा परिवार आहे.

Post a Comment

0 Comments