सोलापुर लॉजवर बीअर पाजून मुलीवर अत्याचार; फोटो व्हायरल
करण्याची धमकी पीडितेने पैसे दिल्यानंतरही तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार
सोलापूर : सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीशी ओळख वाढवून तिच्याशी प्रेमाचे नाटक करत तिला लॉजवर नेऊन जबरदस्तीने बिअर पाजून एका तरुणाने अत्याचार केला.
त्यानंतर अत्याचारावेळीचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडून २ लाख रुपये घेतल्याप्रकरणी ओंकार बाळासाहेब मोरे (वय २३, रा. सोलापूर) याच्यावर बाललैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पीडितेने फिर्याद दिली आहे. पीडितेशी आरोपीची मागच्या वर्षी ओळख झाली होती. त्या ओळखून आरोपीने पीडितेसोबत प्रेमाचे नाटक करत तिला नोव्हेंबर २०२२ मध्ये प्रथम लॉजवर नेत तिला बीअर पाजून ती शुद्धीत नसताना तिच्यावर अत्याचार केला.
त्यावेळीचे तिचे फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी देत माझे कर्ज फेडण्यासाठी पैसे दे म्हणत धमकी दिली. तसेच पीडितेने पैसे दिल्यानंतरही आरोपीने तिच्याशी जबरदस्तीने अत्याचार केला. पीडितेने आपल्या आजीचे एटीएम कार्ड व पासवर्ड ही आरोपी ओंकार मोरे याला दिले.
आरोपी हा त्या एटीएम कार्डद्वारे पैसे काढून घेत होता. थोड्या दिवसांनी पीडितेने याबाबतची माहिती कुटुंबियांस कळवल्यानंतर ही घटना उघडकीस आली. दरम्यान, आरोपीने पीडितेकडून २ लाख रुपये घेत अत्याचारातील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार अत्याचार केला असल्याची फिर्याद दिली आहे.


0 Comments