अकोल्यात तुफान राडा काल डिझिटल इंडिया ” वादग्रस्त इन्स्टाग्राम पोस्टवरून
“अनेक गाड्या जाळल्या,पोलीस- अग्निशमन दलाच्या गाड्यावर दगड फेक ”एक मृत्युमुखी
काल (13 मे) विशिष्ट समाजाच्या धर्मगुरूच्या विरुद्ध इन्स्टाग्रावर अश्लील शब्दात पोस्ट लिहिल्यावर काही लोकांनी एकत्र येऊन याविषयी पोलीस ठाण्यात तक्रार केली.
पोलिसांनी तक्रार दाखल केली तरी या समाजाच्या लोकांचा जमाव नियंत्रणाबाहेर गेला आणि त्यांनी परिसरात तोडफोड करायला सुरुवात केली.
यानंतर परिस्थिती हाताबाहेर गेली अन अकोला शहरातील गंगाधर चौक, हरिहर पेठ या भागात संमिश्र वस्ती आहे. तिथे दोन्ही समुदाय एकमेकांसमोर आले आणि एकमेकांवर मोठ्या प्रमाणात दगडफेक केली.
तसंच अनेक गाड्यांची तोडफोड करण्यात आली.वातावरण प्रचंड तणावपूर्ण बनल.शेकडो लोक रस्त्यावर उतरले या लोकांनी एकमेकांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली
यावेळी काही लोकांनी दिसेल त्या ठिकाणी रस्त्यावर उभ्या असलेल्या गाड्यांना आग लावली अन् जाळपोळ केली. तर 100 हून अधिक बाईकस्वारांनी अकोल्यात फेरफटका मारत दहशत माजवण्यास सुरुवात केली.
यावेळी पोलिसांच्या गाडीवरही यावेळी दगडफेक करण्यात आली. अग्निशमन दलाच्या गाडीवरही जोरदार दगडफेक करण्यात आली, यात अग्निशमन दलाचा एक कर्मचारी जखमी झाला. अनेक गाड्या जाळण्यात आल्या आहेत.
हिंसाचारानंतर अकोला ग्रामीण भागातून पोलीस बंदोबस्त बोलावण्यात आला आहे. तसंच वाशिम, बुलढाणा, अमरावती या भागातून पोलिसांना बोलावण्यात आलं ,पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या सोडल्या. यानंतर एका तासानंतर परिस्थिती नियंत्रणात आली अस समजतंय.
आतापर्यंत या घटनेत आतापर्यंत 26 लोकांना अटक करण्यात आली आहे.
घटने निषयी अधिक माहिती देताना अकोल्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे म्हणाले, “दोन समुदायात काही गैरसमज झाल्याने ही परिस्थिती उद्भवली.
आम्ही गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. जमावाला शांत करण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराचा वापर करावा लागला. आम्ही लोकांना शांततेचं आवाहन केलं आहे.”
या पुढे कोणतीही अप्रिय घटना होऊ नये पोलीस तैनात करण्यात आले आहेत, अशीही माहिती पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिली आहे.
सद्या आज अकोल्यातील परिस्थिती नियंत्रणात असली तरी अजूनही तणावपूर्ण शांतता आहे.त्यामुळे लोकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
तर शहरातील या राड्याच्या पार्श्वभूमीवर शहरात 144 कलम लागू करण्यात आलं आहे.लोकांना शांततेच आव्हान प्रशासन ते सरकारकडून करण्यात येत आहे .
0 Comments