google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक माहिती... नंदेश्वर येथे वीज पडून ऐकाच वेळी चार जनावरे मृत पावली

Breaking News

धक्कादायक माहिती... नंदेश्वर येथे वीज पडून ऐकाच वेळी चार जनावरे मृत पावली

धक्कादायक माहिती... नंदेश्वर येथे वीज पडून ऐकाच वेळी चार जनावरे मृत पावली


मंगळवेढा ; तालुक्यातील  नंदेश्वर येथे लिंबाच्या झाडाच्या खाली बांधलेली 1 म्हैस, 1 रेडा, 1 जर्शी गाय,1 खिलार खोंड अशी 4 जनावरे अंगावर वीज पडून दगावली .  दरम्यान या घटनेचा तलाठी बी.एस. शेख यांनी पंचनामा करुन अहवाल महसूल प्रशासनाकडे सादर केला आहे.

सिध्देश्‍वर नामदेव गरंडे हे आपल्या घरी रात्री झोपलेले असताना रात्री 10.30 वा. जोराचे वादळ व  पाऊस सुरू झाला. या दरम्यान विजांचा मोठा कडकडाट सुरू होता. परिस्थिती पाहून सिध्देश्‍वर गरंडे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी दारात

 लिंबाच्या झाडाखाली बांधलेली जनावरे घरामध्ये नेऊन बांधण्यास सुरुवात केली. एकूण आठ जनावरांपैकी चार जनावरे घरात नेऊन बांधली आणि उरलेली चार जनावरे घरात नेऊन

 बांधायच्या आधी दारामध्ये असलेल्या लिंबाच्या झाडावर अचानक वीज कोसळून मोठा कडकडाट झाला आणि झाडाखाली बांधलेली 1 देशी खोंड, 1 म्हैस, 1 रेडा, 1 जर्शी  अशी एकूण चार जनावरे क्षणात गरंडे यांच्या डोळ्यासमोरच दगावल्याने त्यांच्यावर अर्थिक संकट कोसळले आहे.

गरंडे यांनी   दूध कर्ज घेऊन शेतीचा जोड व्यवसाय असणार्‍या दूध धंद्यावर सध्या आपल्या कुटुंबाची कशीबशी गुजरान करीत आहेत. पण अशा प्रकारच्या निसर्गनिर्मित संकटांमुळे शेतकरी हतबल होत आहेत. 

सिध्देश्‍वर गरंडे यांची शासन स्तरावर योग्य ती दखल घेतली जाऊन मदत व्हावी अशी मागणी नंदेश्वर ग्रामस्थांमधून होत आहे. दरम्यान नंदेश्वरचे तलाठी बी. एस.शेख यांनी सदर घटनेचा पंचनामा केला आहे.

Post a Comment

0 Comments