विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज मधील इ. १२ वी वाणिज्य शाखेतील विद्यार्थीनी कुमारी सायली दीक्षित सांगोला तालुक्यात प्रथम
सांगोला / प्रतिनिधी(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे बोर्डाकडून फेब्रु मार्च, २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या इ. १२ वी सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज मधील इ. १२ वी
वाणिज्य शाखेतील विद्यार्थीनी कुमारी दिक्षीत सायली दत्तात्रय हिने ९१.८३ टक्के गुण मिळवून सांगोला तालुक्यातून सर्वच शाखेतून तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळविला. तसेच बुक कीपिंग अँड अकोटन्सी विषयात १०० पैकी ९९ गुण मिळवून महाराष्ट्र राज्यात द्वितीय क्रमांक मिळविला.
सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडव्यचे सचिव म.शं. घोंगडे, प्राचार्य लक्ष्मण जांगळेव सर्व प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत तिचा पालकासमवेत सत्कार करण्यात आला. सदर यशस्वी विद्यार्थ्यांचे मंडळाचे
अध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके, संस्था सचिव म.शं. घोंगडे, सहसचिव प्रशुध्दचंद्रझपके, खजिनदार शंकरराव सावंत, प्राचार्य लक्ष्मण जांगळे, उपप्राचार्य लक्ष्मण विधाते, उपमुख्याध्यापक गंगाधर घोंगडे, पर्यवेक्षक अजय बारबोले, पोपट केदार, विभिषण माने आदींनी कौतुक केले.


0 Comments