सांगोल्यात रहदारीला अडथळा; दुर्गंधीने नागरिक हैराण वासुद चौकातील मुतारी अडचणीची
सांगोला येथील वासुद चौकामधील मुतारी रस्त्यावरच ठेवल्याने ही मुतारी गैरसोयीची झाली आहे. तसेच यातील मूत्र हे रस्त्यावरच येत
असल्याने या चौकामध्ये दुर्गंधी पसरली आहे. ही मुतारी रस्त्याच्या कडेला बसवावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
सांगोला बसस्थानकाशेजारी असलेला वासुद चौक हा प्रमुख चौक आहे. या चौकामध्ये सर्वच व्यवसाय असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिवसभर माणसांची वर्दळ •असते.
त्यामुळे या चौकात मुतारीअसावी, अशी मागणी येथील लोकांनी केली होती.
त्याप्रमाणे रस्त्याच्या कडेला मुतारी ठेवण्यात आली होती. मात्र गेल्या आठ दिवसांपूर्वी या ठिकाणी असणाऱ्याएमजीपीच्या पाईपला गळती झाल्याने
ही गळती काढण्यासाठी ही मुतारी जेसीबीच्या साहाय्याने उचलून ती रस्त्यावर ठेवली. ती अद्यापपर्यंत उचलण्यात आलेली नाही.
यामुळेया मुतारीचा रहदारीलाही अडथळा निर्माण झाला आहे. तसेच इतरत्र कोठेही मुतारीची सोय नसल्याने रस्त्यावरच ठेवलेल्या मुतारीमध्ये लोक लघुशंका करतात.
ही मुतारी रस्त्यावरील चौकामध्ये असल्याने दुर्गंधी पसरली आहे. तसेच अनेकांची गैरसोय झाली आहे.
याच रस्त्यावरुन काही अंतरावर महाविद्यालय आहे. या रस्त्यावरुन विद्यार्थिनी ये-जा करीत असतात. त्यांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो.
त्यामुळे रस्त्यावरच ठेवलेली मुतारी रस्त्याच्या कडेला ठेवावी, अशी मागणी व्यावसायिक व नागरिकांमधून केली जात आहे.
0 Comments