google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकिंग न्यूज.. शरद पवार पुन्हा भर पावसात: सोलापुरात नक्की काय घडलं? देशभरात चर्चा

Breaking News

ब्रेकिंग न्यूज.. शरद पवार पुन्हा भर पावसात: सोलापुरात नक्की काय घडलं? देशभरात चर्चा

ब्रेकिंग न्यूज.. शरद पवार पुन्हा भर पावसात: सोलापुरात नक्की काय घडलं? देशभरात चर्चा

2019 च्या निवडणुकीदरम्यान साताऱ्यात खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रचारसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार भाषण देत होते. 

त्यावेळी पावसाने हजेरी लावली, पण भर पावसात शरद पवार यांनी आपले भाषण पूर्ण केले.

त्यांच्या सभेची महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात चर्चा झाली. या सभेचे अनेक व्हिडीओ देखील तुफान व्हायरल झाले. या घटनेनंतर राज्यातील ऐतिहासिक सत्तांतर संपूर्ण देशाने पाहिले. पाऊस आणि शरद पवार असं एक समीकरणचं बनलं. 

अशातच या घटनेचा अनुभव त्यांच्या चाहत्यांना पुन्हा एकदा आला आहे. शरद पवार काल सोलापूर दौऱ्यावर होते. दिवसभराच्या सभा आटोपल्यानंतर सहकाऱ्याच्या नातेवाईकाच्या लग्नाला जाण्याचं त्यांचं नियोजन होतं.

त्याचं काय झालं, सोलापूर शहराचे माजी महापौर मनोहर सपाटे यांच्या यांच्या पुतण्याचा विवाह सोहळा होता.

 सभा आटोपल्यानंतर ते विवाहाच्या ठिकाणी निघाले पण अचानक पाऊस आला. पण शरद पवार यांनी शब्द दिला आणि तो पाळला नाही असं कधीच झालं नाही.

 पवारांनी आपला शब्द पाळला आणि भर पावसात विवाहास्थळी रवाना झाले. पंढरपूर, सांगोला दौरा आटोपून ते सोलापुरात रात्री ८ वाजण्याच्या सुमारास दाखल झाले. 

आपले कार्यकर्ते पावसात उभे असल्याचे पाहताच त्यांनीही आपले वाहन थांबवून पावसात भिजतच त्यांचे आभार व्यक्त केले. पवार यांनी नव वधू आणि वराला शुभ आशीर्वाद दिले. 

लग्न सोहळ्या दरम्यान अचानक पाऊस आल्याने सर्वांचीच तारांबळ उडाली होती.पण भर पावसातही शरद पवारांनी लग्नाला हजेरी लावली. विवाह स्थळी दाखल होताच त्यांना पाहून कार्यकर्त्यांनीही एकच जल्लोष केला.

Post a Comment

0 Comments