सांगोला तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी अभिषेक कांबळे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या हस्ते निवडीचे पत्र.
सांगोला (प्रतिनिधी शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क )
जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांच्या शिफारसीने सांगोला तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी महुद येथील सामाजिक कार्यकर्ते युवा नेते ऍड अभिषेक कांबळे यांची निवड झाली आहे.
टिळक भवन मुंबई येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या हस्ते अभिषेक कांबळे यांना रितसर निवडीचे पत्र दिले. प्रदेश निवडणुक अधिकारी पल्लम राजू यांनी सदर निवडीस मान्यता दिली
असून जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांची विशेष शिफारस आहे. त्यांच्या निवडीने काँग्रेस कार्यकर्त्यांनी सांगोला शहर आणि तालुक्यात फटाक्याची अतिषबाजी करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
सांगोला तालुका काँग्रेस कमिटीच्या तालुकाध्यक्ष पदी मा.ऍड. अभिषेक( भैया ) कांबळे यांची जिल्हाध्यक्ष मा. डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांनी निवड झाल्याचे पत्र महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. नाना भाऊ पटोले यांच्या हस्ते टिळक भवन, मुंबई येथे देण्यात आले.
यावेळी माजी मंत्री व राज्य कार्याध्यक्ष मा.आ.नसीम खान, राज्य मुख्य प्रवक्ते मा. अतुलजी लोंढे, राज्य सरचिटणीस मा. देवानंद पवार,वरिष्ठ उपाध्यक्ष मा. विजयकुमार हात्तुरे, राज्य प्रवक्ते मा. काकासाहेब कुलकर्णी यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.
सदर निवडीनंतर सोलापूर जिल्हा काँग्रेस ज्येष्ठ नेते प्रा प्रबुद्धचंद्र झपके, काँग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र कांबळे, महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष मैनाताई बनसोडे, सांगोला शहराध्यक्ष तोहीद मुल्ला यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी नूतन तालुकाध्यक्ष अभिषेक कांबळे यांचे अभिनंदन केले.
सांगोला शहर आणि तालुक्यातील नागरीकांना एकत्र करून पक्षाची संघटनात्मक बांधणी करण्याकडे जास्त लक्ष दिले जाईल. येणाऱ्या काळात वरिष्ठांनी माझ्यावर दाखविलेला विश्वास पक्ष वाढवून आणि पक्षाची संघटनात्मक बांधणी करून सार्थ ठरविला जाईल.


0 Comments