google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला दिवसभरात तीन -तीन ठिकाणी कामाला जाऊन आईने घेतलेल्या कष्टांची जाणीव ठेवत दोन मुली बनल्या पोलिस

Breaking News

सांगोला दिवसभरात तीन -तीन ठिकाणी कामाला जाऊन आईने घेतलेल्या कष्टांची जाणीव ठेवत दोन मुली बनल्या पोलिस

सांगोला दिवसभरात तीन -तीन ठिकाणी कामाला जाऊन आईने घेतलेल्या कष्टांची जाणीव ठेवत दोन मुली बनल्या पोलिस


घरची परिस्थिती अतिशय हलाखीची, त्यात वडिलांचे छत्र हरवलेले, आईने दुसऱ्याच्यात कामाला जाऊन (दिवसभरात तीन -तीन ठिकाणी कामाला जाऊन) आपल्या मुलांना मोठे करत शिकवले. आईच्या कष्टाचे चीज मुलींनी केले. आईबरोबर मुलींनीही लोकांच्यात कामे केली. 

दुसऱ्याची कामे करून मोठ्या जिद्दीने व कष्टाने थोरली मुलगी विद्या अगोदरच मुंबई पोलिस दलात भरती झाली. त्यानंतर नुकतीच धाकली समृद्धी देखील जिद्द आणि कष्टाने पोलिस दलातच भरती झाली आहे.

आईने आपल्या हाता-पायाला बसणाऱ्या चटक्याची कोणतीही परवा न करता पतीच्या निधनानंतर पाच मुलांना सांभाळले. तसेच आपल्या मुलांना समाजामध्ये स्वाभिमानाने जगण्याची नवी जिद्द निर्माण केली. तीन मुली व दोन मुले. पतीचे मुलांच्या लहानपणीच झालेली निधन, अशा परिस्थितीतही ती माऊली डगमगली नाही.

आपल्या आईच्या चटक्याची जाणीव ठेवत मुलांनीही कष्ट व अभ्यास करत जीवनाशी लढा दिला. सांगोल्यातील सूतगिरणीजवळ वासूद हद्दीत असणाऱ्या बाळासाहेब केदार यांचे मुलांच्या लहानपणीच निधन झाले.

 पतीच्या निधनानंतर आई प्रतिभा यांनी दुसऱ्याच्या कामावर जात मुलांचा सांभाळ सुरू केला. घरची परिस्थिती बेताचीच असल्याने आईने दिवसात तीन-तीन ठिकाणी कामे करून मुलांना शिकवले.

दिवसभर आईबरोबर कामाला जाऊन पहाटे चार वाजता उठून पोलिस भरतीसाठी आवश्यक असणारा व्यायाम सांगोल्याच्या क्रीडा संकुलात मुलींनी केला. कष्ट करण्याची तयारी आणि मनाशी जिद्द ठेवून थोरली मुलगी विद्या मुंबई पोलिस दलात या अगोदरच सेवा करीत आहे. 

नुकत्याच झालेल्या पोलिस भरतीमध्ये धाकटी मुलगी समृद्धीनेही यश मिळवले आहे. लवकरच तीही मुंबई पोलिस दलात सेवा बजावण्यासाठी जाणार आहे. एका मुलीचे लग्न झाले असून अजित आणि रणजित ही दोन्ही भावंडे आपल्या आई आणि बहिणीचे कष्ट पाहत आजही काम करीत पोलिस व इतर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करीत आहेत.

तर यश निश्चित मिळते परिस्थिती कोणतीही असो परिस्थितीला प्रत्येकाने सामोरे जात मनामध्ये जिद्द ठेवली पाहिजे. आत्मविश्वासाने स्वतःच्या ध्येयाच्या दिशेने जाण्यासाठी अपार कष्ट केली की प्रत्येकालाच यश हे निश्चितपणे मिळते. आमच्या आईच्या 

कष्टाची जाणीव आम्हाला पावलोपावली होती. आमची कष्टाचे नेहमी तयारी होती. आईच्या आशीर्वादाने यश मिळत गेले, असे मुंबई पोलिसमध्ये असलेल्या विद्या केदार व नूतन भरती झालेल्या समृद्धी केदार यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments