google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 बाळ पडू नये म्हणून आईने काळजीपोटी रुमाल बांधला; फास लागल्याने अनर्थ घडला

Breaking News

बाळ पडू नये म्हणून आईने काळजीपोटी रुमाल बांधला; फास लागल्याने अनर्थ घडला

 बाळ पडू नये म्हणून आईने काळजीपोटी रुमाल बांधला; फास लागल्याने अनर्थ घडला 

मन सुन्न करणारी ही घटना गुरूवारी दुपारच्या सुमारास जळगाव जिल्ह्यातील जामनेर शहरात घडली. निर्भय इंगळे (वय अवघं १ वर्ष) असं मृत चिमुकल्याचं नाव आहे. आपल्या लहानग्या बाळाला झोक्यात झोपवून आई कामावर निघून गेली. 

चिमुरड्याला शांत झोप लागावी, तो झोक्यातून पडू नये, म्हणून या माऊलीने झोक्याला कवच म्हणून रुमाल देखील बांधला. पण हाच रुमाल या बाळासाठी काळ ठरला. झोपेतून उठल्यानंतर झोक्याबाहेर पडण्याच्या प्रयत्नात हाच रुमाल बाळाच्या गळ्यात अडकला आणि गळफास लागून त्याचा मृत्यू झाला. 

मन सुन्न करणारी ही घटना गुरूवारी दुपारच्या सुमारास जळगाव जिल्ह्यातील जामनेर शहरात घडली. निर्भय इंगळे (वय अवघं १ वर्ष) असं मृत चिमुकल्याचं नाव आहे. 

१० दिवसांपूर्वीच निर्भयचा पहिला वाढदिवस होता. पोटचा गोळा अचानक काळाने हिरावून नेल्याने आईने हंबरडा फोडला. या घटनेनं परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे,
 प्राप्त माहितीनुसार, जामनेर शहरातील  गिरीजा कॉलनी परिसरात वसंत इंगळे हे आपल्या पत्नी आणि कुटुंबासह वास्तव्यास आहे. वसंत हे एका वाहनचालक असून त्यांची पत्नी एका खासगी रुग्णालयात कामाला आहे. गुरूवारी सकाळी नेहमीप्रमाणे वसंत आपल्या कामावर निघून गेले. 

त्यानंतर त्यांच्या पत्नीने घरची कामे आवरून बाळाला स्तनपान करून झोक्यात झोपवलं. 
मी कामाला जाते बाळावर लक्ष ठेव, असं म्हणत बाळाच्या आईने आपल्या धाकट्या बहिणीला झोक्यात झोपलेल्या बाळावर लक्ष ठेवण्यास सांगितलं. 

निर्भय शांतपणे झोपला होता. हे पाहून बाळाची मावशी जेवण करण्यासाठी किचनमध्ये गेली. तेथून परतल्यानंतर ती निर्भयकडे गेली असता, तो झोक्यात लटकलेल्या अवस्थेत दिसून आला.

Post a Comment

0 Comments