google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

Breaking News

सांगोला स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

सांगोला स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन


सांगोला / प्रतिनिधी :(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क)
१४ मे रोजी स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त सांगोला येथे छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव मंडळ, मराठा सेवा संघ,

 संभाजी ब्रिगेड, शिवप्रेमी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमा शंभू जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संयोजकांच्यावतीने देण्यात आली आहे.


या जयंती सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यातआले असून रविवार १४ मे रोजी सकाळी ९ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती संभाजीमहाराज यांच्या प्रतिमेस अभिषेक व पुष्प अर्पण सोहळा होणार


 असून सायंकाळी ७.३० वाजता इतिहास संशोधक, साहित्यिक, लेखक, शिव व्याख्याते शिवश्री मा. प्रा. महेंद्र कदम सर यांचे "शिवपुत्र छत्रपती संभाजीराजे" या विषयावर व्याख्यान होणार आहे. 


तरी या कार्यक्रमासाठी सांगोला शहर व तालुक्यातील सर्व शिव-शंभू प्रेमी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सांयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments