google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक घटना.. चोरांनी नाही तर बायकोनेच केला खुन..

Breaking News

धक्कादायक घटना.. चोरांनी नाही तर बायकोनेच केला खुन..

धक्कादायक घटना.. चोरांनी नाही तर बायकोनेच केला खुन..

अकोला तालुक्यातील वाकी येथे चोरट्यांच्या मारहाणीत मृत्यु झालेल्या युवकाच्या खुनाचा तपास राजर पोलिसांनी अवघ्या ४८ तासात उलगडला असुन चोरट्या बहाण्याखाली युवकाच्या पत्नीनेच सदर खुन केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे 

सविस्तर वृत्त असे की अकोले तालुक्यातील वाकी येथे मधुकर किसन सगभोर याचा चोरट्यांच्या मारहाणीत मृत्यु झाला असल्याची फिर्याद मयताची मुलगी पायल सगभोर हिने दिली होती .

 पंरतु घटना घडलेल्या ठिकाणची परिस्थिती पाहता सर्व प्रकार संशयास्पद वाटत होता . आदिवासी भागात आजपर्यंत अशा प्रकारची घटना घडने म्हणजे प्रश्नचिन्ह पडण्यासारखे होते . राजुर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश इंगळे यांनी घटना घडलेल्या प्रत्यक्ष भेट दिली 

असता त्यांनाही सदर प्रकार संशयास्पद वाटल्याने त्यांनी घरापासुन घरातील व्यक्तींवर संशय व्यक्त केला होता . सखोल चौकशीत मयताची पत्नीनेच मयत मधुकर किसन सगभोर याचा खुन केल्याचे निष्पन्न झाले आहे . मधुकर सगभोर याने दारु पिण्यासाठी आपल्या मुलाकडे घटनेच्या पैसे मागितले होते . 

सदर पैसे मधुकर याला मुलाने न दिल्याने मुलास मधुकरकडुन बेदाम मारहाण करण्यात आली होती . त्याच्या बायको व मुलीने कशीबशी मुलाची मधुकरच्या तावडीतुन सुटका केली होती . त्याच रात्री पुन्हा मधुकर व त्याच्या बायकोचे कडाक्याचे भांडण झाले .

 मधुकर याने त्याची बायको पुष्पालाही मारहाण केली होती . त्यामध्ये ती जखमी झाली . दोघांच्या झटापटीत मधुकर हा डोक्यावर पडला .तशातच पुष्पा हिने मधुकर याच्या दिशेने गालावर बटाटे किसण्याच्या किसणी भिरकावली .ती त्याच्या गालावर लागली . मधुकर याच्या डोक्यामध्ये अंतर्गत व गालावर रक्तश्राव फार झाला व त्यातच मधुकर याचे निधन झाले . 

मधुकर मयत झाल्याचे समजताच त्याची बायका पुष्पा हीने घरात दरोडा पडल्याचा बनाव करत घरातील कपडे अस्ताव्यस्त केले .तर डब्यांची पंलगावर उचकापाचक करुन ठेवली . सदर प्रकार राजुर पोलिस स्टेशन ला कळल्यानंतर तात्काळ पोलिसांनी मधुकरचे घर गाठत चोरटे शोधण्याचा प्रयत्न केला होता . 

परंतु सदरची वस्तुस्थिती पाहता सदर प्रकार राजुर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक यांच्या चाणाक्ष नजरेतुन सुटला नाही . त्यांनी घरातील सदस्यावरच लक्ष केंद्रित करत तपासास सुरुवात केली . यामध्ये मयताची पत्नी ही गुन्हेगार असल्याचे तपासात निष्पन्न झा

Post a Comment

0 Comments