धक्कादायक! अंगाला हळद लागण्यापूर्वीच नवरदेवाने केली आत्महत्या; सोलापूर जिल्ह्यातील घटना, रविवारी होते लग्न
अक्कलकोट तालुक्यातील रामपूर कॉम्प्युटर ऑपरेटर तथा सरपंच पुत्र श्रीकांत इरण्णा बिराजदार (वय (२८) याने गळफास घेऊन आत्महत्या केली.ही घटना बुधवार दि.१७ मे रोजी सकाळी सहा वाजता घडली. याबाबत दक्षिण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्याचे लग्न ठरलेले होते. रविवारी अक्षतादेखील पडणार होत्या. श्रीकांत हा मागील काही वर्षांपासून म ग्रामपंचायत कार्यालयात कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून काम पाहत होता.
त्याचं लग्न ठरलं होतं. येत्या रविवारी र २१ मे रोजी विवाह होणार होता. बुधवारी सकाळी त्याने स्वतःच्या शेतातील लिंबाच्या झाडाच्या फांद्याला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
त्याच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ, दोन बहिणी आहेत. तो सरपंच शोभा बिराजदार यांचा मुलगा होता. बुधवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.


0 Comments