google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक प्रकार ...पुण्यात पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत हिटरने चटके देत बलात्कार

Breaking News

धक्कादायक प्रकार ...पुण्यात पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत हिटरने चटके देत बलात्कार

 धक्कादायक प्रकार ...पत्नीच्या हातात मुलीचा मोबाइल दिसताच तो बिघडला,

हिटरने चटके देत अत्याचार पतीचा क्रुरतेचा कळस

पुण्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीचे हात-पाय बांधून गुप्तांगावर हिटरने चटके देत अत्याचार केल्याचा प्रकार कोंढवा भागातून समोर आला आहे. 

या प्रकरणी नराधम पतीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात ही महिला गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी महिला त्यांच्या सोळा वर्षे मुलीचा मोबाईल पाहत होत्या. यावेळी आरोपी पतीने पत्नी कोणासोबत बोलत तर नाही ना? असा संशय आला 

त्यामुळे त्याने तिला हाताला धरून बेडरूममध्ये घेऊन गेला. बाहेर मुले ओरडत असतानाही त्याने 

फिर्यादीचे ओढणीने हातपाय बांधले. त्यानंतर हिटर गरम करून फिर्यादीच्या गुप्तांगावर त्याचे चटके दिले. इतकेच नाही

 तर अतिशय क्रूररित्या त्याने पत्नी सोबत शरीर संबंध ठेवले. तोंडावर लघुशंका केली.

 तुला खूप माज आला आहे. तुझा माज उतरवितो, म्हणून शिवीगाळ करून फिर्यादी यांच्या डोक्यात, हातापायावर खलबत्याने मारहाण केली. 

दरम्यान, त्यांचा आरडाओरडा ऐकून बाहेरून मुलेही अधिक आरडाओरडा करू लागली.

 तेव्हा त्याने दरवाजा उघडला. तेव्हा १६ व ११ वर्षांची मुलगी फिर्यादीकडे आल्या असताना त्यांच्यासोबतदेखील गैरवर्तन करण्याची धमकी दिली. 

या सर्व प्रकारानंतर जखमी झालेल्या महिलेला उपचारांसाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 चार दिवसांपुर्वी हा प्रकार घडला आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.

पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेऊन त्याने मुलांची जबाबदारी झटकली. नंतर पती जेंव्हा मारहाण करुन बाहेर गेल्यानंतर महिलेने रुग्णालय गाठले.

 पोलिसांना याघटनेची तक्रार दिली. कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखलकरून या नराधम पतीला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Post a Comment

0 Comments