google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 अत्यंत वेदनादायी घटना ...पंढरपूर - करकंब रस्त्यावर अपघात, तीन महिला मृत्युमुखी !

Breaking News

अत्यंत वेदनादायी घटना ...पंढरपूर - करकंब रस्त्यावर अपघात, तीन महिला मृत्युमुखी !

 अत्यंत वेदनादायी घटना ...पंढरपूर - करकंब रस्त्यावर अपघात, तीन महिला मृत्युमुखी !


पंढरपूर - टेंभुर्णी रस्त्यावर झालेल्या अपघातात पंढरपूर तालुक्यातील तीन महिला ठार झाल्या असून सहा महिला जखमी झाल्या आहेत.  आधीच दु:खात असलेल्या कुटुंबाला लगेच आणखी एक मोठा धक्का बसला आहे. 

रस्ते चकाचक झाले पण लोकांचे जीव मात्र किडा मुंगीसारखे जाऊ लागले आहेत, वेगावर कुणाचेच नियंत्रण उरले नसून रोज आजूबाजूला अपघाताच्या घटना घडत आहेत. होणाऱ्या या अपघातात निरपराध व्यक्तींचे प्राण जाऊ लागले आहेत

 तरीही वेग कमी होताना दिसत नाही. अंत्यविधी उरकून घराकडे परत येत असलेल्या गर्दीत घुसलेल्या एका ट्रकने महिलांना चिरडले आणि यात तीन महिलांचा मृत्यू झाला तर अन्य सहा महिला जखमी झाल्या आहेत.

 पंढरपूर तालुक्यातील टाकळी (गुरसाळे) येथे ही धक्कादायक आणि अत्यंत वेदनादायी घटना घडली आहे. सासऱ्याचा अंत्यविधी करून लोक घराकडे परतत असताना या महिलांचा मृत्यू झाला आहे त्यामुळे प्रचंड हळहळ व्यक्त होऊ लागली आहे.

 घरातील व्यक्तीचा मृत्यू झाल्याने कुटुंब आणि नातेवाईक आधीच शोकात होते. दु:खात असलेल्या टाकळी येथील गुटाळ कुटुंबाला हा फार मोठा धक्का बसला आहे. 

टाकळी (गुरसाळे) येथील गेनदेव गुटाळ यांचे काल संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास  निधन झाले. पाहुणे, नातेवाईक आल्यानंतर रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास, गुरसाळे येथील स्मशान भूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

 कुटुंब आणि नातेवाईक तसेच गावकरी या दु:खात असतानाच त्यांच्यावर आणखी एक दु:खाचा डोंगर कोसळला. स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करून परत घराकडे येत असतांना एक ट्रक सरळ महिलांच्या घोळक्यात शिरला आणि या ट्रकने महिलांना चिरडले. 

करकंबकडून हा ट्रक वेगात येत होता आणि त्याचे नियंत्रण न राहिल्याने तो थेट महिलांच्या घोळक्यात घुसला. यावेळी त्याने महिलांना चिरडले असून यात ३५ वर्षे वयाच्या हिराबाई भारत गुटाळ आणि ४० वर्षीय  मुक्ताबाई गोरख गुटाळ या दोघी जागीच ठार झाल्या.

 मयत गेनदेव यांच्या त्या सुना होत्या. तिसऱ्या महिलेचाही मृत्यू झाल्याची माहिती येत असून या महिलेचे  नाव मात्र समजू शकले नाही. यावेळी अन्य सहा महिला देखील जखमी झाल्या आहेत. या घटनेने टाकळी, गुरसाळे परिसरात प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments