धक्कादायक!शॉर्ट सर्किट होऊन लागलेल्या आगीत २२ वर्षीय सिव्हील इंजिनिअर तरुणाचा होरपळून मृत्यू सांगोल्यातील घटना
सांगोला मध्यरात्री अचानक इलेक्ट्रिक बोर्डमध्ये शॉर्ट सर्किट होऊन लागलेल्या आगीत सिव्हील इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना
कडलास ता. सांगोला येथे घडली. संजय तानाजी गायकवाड वय २२ असे आगीत होरपळून मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. याबाबत सागर तानाजी गायकवाड यांनी सांगोला पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, मयत संजय तानाजी गायकवाड वय २२ वर्षे हा सिव्हील इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत होता . २५ मे रोजी आई, वडील, भाऊ सागर असे जेवणखान करुन झोपले होते.
पहाटे चारच्या सुमारास संजय झोपलेल्या खोलीतून धुराचा वास येत असल्याने भाऊ सागर चुलते शिवाजी, आई वडील यांनी संजय यास आवाज दिला असता तो काहीएक उत्तर देत नसल्याने त्यांनी घराच्या पाठीमागील बाजूस जावून खिडकीतून आतमध्ये पाहीले आता आतजाळ व धुर दिसून आला.
त्यानंतर चुलते शिवाजी, वडील तानाजी व सागर यांनी दरवाजा उघडून आतमध्ये जावून पाहीले असता खोलीमध्ये टिव्ही जवळील इलेक्ट्रीक बोर्डमध्ये शॉर्ट सर्किट होऊन इलेक्ट्रीक बोर्ड व टीव्ही जळला असल्याचे दिसून आले.
तसेच शेजारील लोखंडी खाटेवरती झोपलेला लहान भाऊ संजय तानाजी गायकवाड वय २२ वर्षे हा शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत पूर्णपणे जळाला असल्याचे दिसून आले. त्यानंतर संजय यास उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
डॉक्टरांनी तपासले असता संजय याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगितले. याबाबत सागर तानाजी गायकवाड यांनी सांगोला पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.


0 Comments