google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोठी बातमी कै. सरदार शामराव लिगाडे विद्यालय अकोला वासुद येथे तब्बल 29 वर्षानंतर

Breaking News

मोठी बातमी कै. सरदार शामराव लिगाडे विद्यालय अकोला वासुद येथे तब्बल 29 वर्षानंतर

 मोठी बातमी कै. सरदार शामराव लिगाडे विद्यालय अकोला वासुद येथे तब्बल 29 वर्षानंतर..


सांगोला/( प्रतिनिधी शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क)

अरे तू कुठे आहेस तू काय करतेस तू लय मोठा झालास कस काय चाललंय तुझं तब्बल 29 वर्षानंतर सांगोला तालुक्यातील अकोला हायस्कूल मधील 1994 95 मातीतील वर्ग मित्रांच्या गप्पागोष्टी झाल्या

 मुलं मुली व वर्गशिक्षक गप्पागोष्टी चांगले रंगून गेले होते अकोला येथील रयत शिक्षण संस्थेच्या पटांगणामध्ये 29 वर्षांनी माजी विद्यार्थ्यांची शाळा भरलवी

 गुरुवर्य यांचे स्वागत हलगी ताशांच्या गजरामध्ये पुष्पवृष्टी करून करण्यात आला त्यावेळी ची शिपाई हत्तेकर मामा यांनी दहा वाजून 45 मिनिटांनी शाळेची घंटा वाजविली त्यावेळी चे पीटी शिक्षक माननीय श्री जाधवर सर यांनी सर्वांना लायनीत उभा करून राष्ट्रगीताची सुरुवात करून दहावीच्या वर्गामध्ये जाण्याचे सूचना करण्यात आल्या

 शिक्षक आणि विद्यार्थी विद्यार्थिनी हे सर्व एका ड्रेस कोड मध्ये होते सर्वांनी आपल्या जुन्या स्मृतींना उजाळा दिला मुख्याध्यापक श्री वि खे पाटील सर मधुकर पवार भगवान केदार बबन मुलानी जाधवर सर स्वामी सर कदम सर पांढरेमिसे सर व मुख्याध्यापक माननीय श्री कांबळे सर पूर्वी उपस्थित होते.

प्रारंभी कर्मवीर भाऊराव पाटील व वहिनींच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन केले त्या वेळचे काही शिक्षक व विद्यार्थी आम्हाला सोडून गेलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आले आलेले सर्व शिक्षक यांचा सत्कार करण्यात आला 

शिक्षकांना भेट म्हणून सोनाटा कंपनीचे घड्याळ व पैठणी साडी व ट्रॉफी देण्यात आली तसेच आमच्या वर्ग मैत्रीण शालिनी सुखदेव शिंदे हिचा मुलगा तालुका कृषी अधिकारी झाला म्हणून विशेष सत्कार अकोला गावच्या सरपंच व शिक्षकांच्या हस्ते करण्यात आला

 प्रस्ताविक विजय लिगाडे सर यांनी केले सूत्रसंचालन श्री चंदनशिवे यांनी केले अशोक गव्हाणे पुण्यवंत खटकाळे नंदकुमार गव्हाणे चारुशीला गव्हाणे शालन शिंदे मनीषा भसाळे बाळासाहेब सावंत आदी लोक विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला 

शाळेमध्ये शिकलेल्या ज्ञानाचा उपयोग आयुष्यात कसा झाला या विषयी मनोगत व्यक्त केले यानंतर शिक्षकांची मार्गदर्शन झाले 

काही शिक्षकांच्या डोळ्यातून पाणी आले विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला शिक्षक विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी भारतीय बैठकीत प्रमाणे एकत्र स्नेह भोजनाचा आस्वाद घेतला त्याच्या चेहऱ्यावर उत्साह आणि आनंद दिसत होता प्रत्येकाने शिक्षकांच्या मार खाल्लेली आठवण करून दिली 

कार्यक्रमांमध्ये सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी व शिक्षक यांच्यामध्ये संगीत खुर्चीचा खेळ खेळतात उत्साह दिसून आला लहानपणीचा सर्व आठवणी मनामध्ये ठेवून 25 मुली 37 मुले व 9 शिक्षकांनी स्नेह मेळाव्याचा निरोप घेतला आभार प्रदर्शन श्री बाळासाहेब सावंत यांनी केले.

Post a Comment

0 Comments