स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांची धडाकेबाज कामगिरी......दिवसा घरफोडी करणारा अंतर जिल्हा अट्टल गुन्हेगार जेरबंद,
10 दिवसा घरफोडी व 1 जबरी चोरीचा असे एकुण 11 गुन्हे उघड, 5,18,600 रुपये किमतीचे सोने चांदीचे दागिने हस्तगत....
सोलापूर ग्रामीण जिल्हयातील घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणुन सदर गुन्हयांना प्रतिबंध मा. पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण श्री.शिरीष सरदेशपांडे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांना सुचना दिल्या होत्या सदर सुचना प्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास जगताप स्थानिक गुन्हे शाखा,
सोलापूर ग्रामीण यांनी सहा.पोलीस निरीक्षक धनंजय पोरे यांना जिल्हातील दिवसा व रात्री घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणणे बाबत आदेशीत केले होते.
नमुद आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेकडील सहा.पोलीस निरीक्षक धनंजय पोरे व त्यांचे पथक सोलापूर ग्रामीण जिल्हयातील दिवसा घरफोडी करणा-या आरोपीत यांचा गोपनिय बातमीदार या व्दारे शोध घेत असताना ॲनालिसीस विंगचे पो.हवालदार/सलीम बागवान यांनी केलेल्या
विश्लेषणात आरोपी याचे घटनास्थळीसंशयास्पद अस्तित्व आढळुन आले. सदर पथकाने आरोपीत याचा करमाळा येथे सापळा रचुन अत्यंत कौशल्याने आरोपीत यास ताब्यात घेतले.
सदर आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन त्याचे विरुध्द बीड उस्मानाबाद, लातुर, सोलापूर ग्रामीण जिल्हयात दिवसा घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत सदर आरोपी हा नेहमी वेगवेगळे साथीदार घेवुन गुन्हे करीत असतो. सदर आरोपीकडे स्थानिक गुन्हे शाखेच्या नमुद पथकाने केलेल्या कौशल्यापुर्ण
तपासामुळे आरोपीत याने सोलापूर ग्रामीण जिल्हयात *सन 2023 मध्ये जानेवारी महिन्यापासुन ते आजतागायत एकुण-10 दिवसा घरफोडीचे गुन्हे त्याचे साथीदारा समवेत केल्याची कबुली दिली
आणि. तसेच आरोपी याने त्याचे साथीदारा समवेत सन-2022 मध्ये करमाळा पोलीस ठाणे हद्दीत जबरी चोरीचा गुन्हा केले असल्याचे सांगितले आहे. आरोपीत याचेकडुन करमाळा पोलीस ठाणे 4 गुन्हे, कुर्डुवाडी पोलीस ठाणे 3 गुन्हे, बार्शी शहर, टेंभुर्णी व करकंब पेालीस ठाणे
प्रत्येकी 1 गुन्हा असे एकुण 10 दिवसा घरफोडीचे गुन्हे तसेच करमाळा पोलीस ठाणेचा 1 जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे.नमुद आरोपी यास करमाळा पोलीस ठाणे गुरंन:-771/2023 भादंवि क 394, 34 या गुन्हयात अटक करण्यात आली असुन त्याची दिनांक:-18/05/2023 ते 25/05/2023 या मुदतीत पोलीस कोठडी घेण्यात आली
असुन मुदतीत आरोपीत याचेकडुन वर नमूद *एकुण 11 गुन्ह्यातील 5,18,600/- रु.चे सोने चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले आणि. सदर गुन्हयाचा तपास श्रेणी पोलीस उप-निरीक्षक, राजेश गायकवाड, स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण हे करीत आहेत. सध्या आरोपी करमाळा पोलीस ठाणे यांचे पोलीस कस्टडीत आहे.
नमुद आरोपी हा सन 2022 मधील सोलापूर ग्रामीण जिल्हयातील एकुण 6 दिवसा घरफोडीचे गुन्हयामध्ये पाहिजे आरोपी आहे. सदरची कामगिरी ही मा.पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण श्री. शिरीष सरदेशपांडे, व अपर पोलीस अधीक्षक, श्री. हिम्मत जाधव, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सुहास जगताप स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण यांचे नेत्तृत्वाखाली... सहा.पोलीस निरीक्षक/ धनंजय पोरे
श्रेणी पोसई/ राजेश गायकवाड
सपोफौ/श्रीकांत गायकवाड
सपोफौ/बिराजी पारेकर सपोफौ/निलकंठ जाधवर पोहवा/सलीम बागवान पोहवा/विजयकुमार भरले पोहवा/हरिदास पांढरे पोहवा/आबासाहेब मुंढे पोना/रवी माने
पोकॉ/ समर्थ गाजरे पोकॉ/विनायक घोरपडे चापोशि/दिलीप थोरात पोना/ व्यंकटेश मोरे ने. सायबर पो.स्टे
यांनी केली आहे.


0 Comments