google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला रस्त्यावर सापडलेले 1 लाख 25 हजार रूपये केले परत सांगोला येथील गुलाब शिंदे यांचा प्रामाणिकपणा

Breaking News

सांगोला रस्त्यावर सापडलेले 1 लाख 25 हजार रूपये केले परत सांगोला येथील गुलाब शिंदे यांचा प्रामाणिकपणा

सांगोला रस्त्यावर सापडलेले 1 लाख 25 हजार रूपये केले परत सांगोला येथील गुलाब शिंदे यांचा प्रामाणिकपणा

सांगोला/प्रतिनिधी(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क) :

सांगोला शहरातील वासूद रोड, जिव्हाळा कॉलनी येथील गुलाब मच्छिंद्र शिंदे यांनी दोन तरुण युवकांकडून गहाळ झालेले 1 लाख 25 हजार रुपये त्यांच्या स्वाधीन करत प्रामाणिकपणाचा आणखी एक नवा आदर्श समाजापुढे ठेवला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जुनोनी येथील गॅस एजन्सीमध्ये काम करणार्‍या दोन तरुण युवक कर्मचार्‍यांची 1 लाख 25 हजार रुपये रोख रक्कमेची पिशवी वासूद रोड पाण्याच्या टाकीजवळ अनावधनाने पडली होती.

 याचवेळी रस्त्यावर रात्री 11 वाजण्याच्या सुमारास फिरुन झाल्यावर घराकडे परत जात असताना गुलाब शिंदे यांना ती पिशवी आढळून आली.

 पिशवीमध्ये पाहिल्यानंतर रक्कम आढळून आले. त्यानंतर पाण्याच्या टाकीजवळ दोन युवक अस्वस्थ चेहर्‍याने रस्त्याने वारंवार फिरत असताना त्यांच्या निदर्शनास आले.

 त्या दोन युवकांचे चेहर्‍यावर भेदरलेले भाव गुलाब शिंदे यांनी अचून टिपले. त्यांच्या नाराज चेहर्‍याकडे पाहत नाराजीचे कारण विचारत अंदाज घेतला. 

विचारपुस करत असताना त्या दोन युवकांनी साश्रु नयनांनी 1 लाख 25 हजार रुपयांची कहाणी सांगितली. त्यांच्या शब्दातील वास्तव गुलाब शिंदे यांच्या विश्‍वासास पात्र ठरली.

 पैसे त्यांचेच असल्याची खात्री केली. आणि कुठल्याही मोहाला बळी न पडता 1 लाख 25 हजार रुपयांची पिशवी लगेचच त्यांच्या स्वाधीन केली.

गुलाबराव शिंदे यांनी केलेल्या कार्याने त्याच्या घरचेच नाही तर सांगोला तालुक्याची मान उंच केलेली आहे. गुलाबराव शिंदे यांचे सांगोला तालुक्यासह परिसरातून कौतुक केले जात आहे.

आजच्या या जगात लोक हक्काचे पैसे बुडवायला कमी करत नाहीत तर कोणा अनोळखी व्यक्तीचे पैसे परत करण्याचा विचार करणारे मोजकेच लोक या जगात आहेत.

 खरंच त्याबद्दल गुलाब शिंदे यांचे अभिनंदन करणे गरजेचे आहे. त्यांच्या प्रामाणिकपणाचे सोशल मिडीयावर कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments