google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापूर ग्रामीण पोलीस शाबासकी.मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परीक्षेत्र, कोल्हापूर यांचेकडून सोलापूर ग्रामीण पोलीस शाबासकी

Breaking News

सोलापूर ग्रामीण पोलीस शाबासकी.मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परीक्षेत्र, कोल्हापूर यांचेकडून सोलापूर ग्रामीण पोलीस शाबासकी

 सोलापूर ग्रामीण पोलीस शाबासकी.मा. विशेष पोलीस महानिरीक्षक,

कोल्हापूर परीक्षेत्र, कोल्हापूर यांचेकडून सोलापूर ग्रामीण पोलीस शाबासकी

दिनांक ०५ मे २०२३ रोजी मा. श्री. सुनिल फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक,

 कोल्हापूर परीक्षेत्र, कोल्हापूर यांनी पोलीस संकुल, पंढरपूर येथे सोलापूर ग्रामीण पोलीस दलाची गुन्हे आढावा बैठक घेतली. सदर बैठकीमध्ये उघडकीस न आलेले गंभीर गुन्हे, प्रलंबीत गुन्हे याबाबत आढावा

 घेवून गुन्हे शाबीतीकरणामध्ये वाढ होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणेबाबत सुचीत केले आहे. तसेच आगामी आषाढी वारीच्या संदर्भाने पालखी सोहळा व श्री क्षेत्र पंढरपूर येथील वारी बंदोबस्ताचे नियोजन व आखणी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

बैठकीच्या सुरुवातीसच मा. श्री. सुनिल फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परीक्षेत्र, कोल्हापूर यांनी 

सोलापूर ग्रामीण पोलीस दलाकडून राबविण्यात आलेल्या " ऑपरेशन परीवर्तन" या उपक्रमास मा. पंतप्रधान यांचा प्रशासनातील नावीन्यपूर्ण योजनासाठीचा पुरस्कार मिळाल्याबद्दल

 मा. श्री. शिरीष सददेशपांडे, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांचे तसेच या उपक्रमामध्ये योगदान देणारे पोलीस अधिकारी व अंमलदार यांची प्रशंसा करून अभिनंदन केले.

सदर बैठकीसाठी मा. श्री. सुनिल फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परीक्षेत्र, कोल्हापूर, मा. श्री. शिरीष सददेशपांडे, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण, मा. श्री. हिंमत जाधव, अपर पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण, 

सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सोलापूर, पंढरपूर व अकलूज उपविभागातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयातील सर्व शाखा अधिकारी हजर होते.

Post a Comment

0 Comments