सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी RPI आठवले गटाची बैठक संपन्न
सांगोला (प्रतिनिधी शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क ) सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकी संदर्भात सांगोल्यातील गोकुळ हॉटेल येथे आर पी आय आठवले गट या पक्षाची बैठक संपन्न झाली. या बैठकीला
स्वर्गीय भाई गणपतरावजी देशमुख परिवर्तन महाविकास आघाडीचे प्रमुख व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बाबुरावजी गायकवाड, शेतकरी कामगार पक्षाचे नेते ॲड. सचिन देशमुख काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र कांबळे उपस्थित होते.
या बैठकीमध्ये सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समितीच्या निवडणुकीसंदर्भात मतदारांना माहिती देण्यात आली. बैठकीमध्ये स्वर्गीय भाई गणपतरावजी देशमुख परिवर्तन महाविकास आघाडी या नावाने आघाडी स्थापन केलेली आहे
यामध्ये शेतकरी कामगार पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, भारतीय काँग्रेस पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट इत्यादी पक्षाच्या वतीने परिवर्तन महाविकास आघाडी स्थापन केलेली आहे,
शेतकऱ्यांच्या हिताचे काम करण्यासाठी ही परिवर्तन महाविकास आघाडी स्थापन केलेले असून आपणास मतदाराकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे
आपला विजय निश्चित असल्याचे मत शेतकरी कामगार पक्षाचे नेते ॲड सचिन देशमुख यांनी व्यक्त केले . मतदारांना व कार्यकर्त्यांना निवडणूक जिंकण्यासाठी मार्गदर्शन केले.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे निवडणूक लावायची असेल तर माझा अर्ज भरा माघार घेणार नाही असे मी विरोधी आघाडीच्या नेतेमंडळींना सांगितले होते
त्यानंतर शेवटी दीपक आबा साळुंखे पाटील यांनी अर्ज मागे घेण्याची विनंती केली तरीसुद्धा मी अर्ज माघारी घेतला नाही .
एकमेकांना विरोध करणारे नेते एकत्र आल्यामुळे सामान्य नागरिकांना व इतर पक्षांना विचारात न घेता निवडणूक बिनविरोध करण्यासाठी विरोधी आघाडीच्या नेत्यांनी एकत्र येऊन
आघाडी स्थापन केल्यामुळे तालुक्यातील मतदार व जनतेला हे आवडले नाही त्यांना ते मान्य नसल्यामुळे आम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी परिवर्तन महाविकास आघाडी स्थापन केली.
याला लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून आपला विजय शंभर टक्के असल्याचे मत पॅनल प्रमुख, राष्ट्रवादीचे नेते बाबुरावजी गायकवाड यांनी व्यक्त केले
यावेळी आरपीआयचे जिल्हा कार्याध्यक्ष विक्रम शेळके, तालुकाध्यक्ष खंडू सातपुते इत्यादी पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले व मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले
यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष विक्रम दादा शेळके, मातंग आघाडी प्रदेश उपाध्यक्ष दामोदर साठे ,जिल्हा उपाध्यक्ष दिगंबर गवळी,
जिल्हा नेते राजा मागाडे ,रवी बनसोडे, शंकर फाळके ,नवा सरतापे ,विवेकानंद क्षीरसागर, तालुकाध्यक्ष खंडू सातपुते, तालुका संघटक सदाशिव सावंत,
कोषाध्यक्ष विनोद उबाळे, सरचिटणीस सुरज होवाळ,युवक तालुकाध्यक्ष सौदागर सावंत, युवक तालुका संघटक शशिकांत साबळे, मातंग आघाडी तालुकाध्यक्ष शहाजी माने ,ज्येष्ठ नेते अर्जुन लांडगे, बंडोपंत लांडगे,
सदाशिव शेळके, लक्ष्मण वाघमारे, मोहन कांबळे ,युवा नेते संजय करडे, आशिष गायकवाड, रमेश करडे, दत्ता सावंत, अनिल कांबळे, अतुल सावंत, बजरंग गायकवाड, महूद शहराध्यक्ष पिंटू सरतापे,
गौतम चंदनशिवे, गौतम जगधने, डॉक्टर सुरेंद्र ढोबळे, दगडू कांबळे ,आबा चव्हाण, महेश पाटोळे, सुधीर उबाळे, शहाजी सावंत, खंडू जगधने, बयाजी उबाळे, दगडू कांबळे इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
0 Comments