मोठी बातमी राज्यातील पहिली मदत सोलापुरात; कोरोनात मृत्यू
पावलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्याच्या वारसास ५० लाखांची मदत
कोरोना काळात मृत्यू पावलेले कंत्राटी कर्मचारी प्रशांत ओहोळ यांना राज्यातील पहिली ५० लाख रुपयांची मदत शासनाने मंजूर केली आहे.
सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते माता आशा ओहोळ व पिता परमेश्वर ओहोळ यांना मंजुरीचा आदेश प्रदान करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघाने यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. राज्यात कंत्राटी कर्मचारी यांना देण्यात आलेली ही पहिली मदत आहे.
जिल्हा परिषदेत सीईओ यांच्या दालनात माढा तालुक्यातील पालवण ग्रामपंचायतीचे डाटा एन्ट्री ऑपरेटर प्रशांत ओहोळ यांच्या वारसास मदतीचा आदेश सीईओ दिलीप स्वामी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
या प्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, राज्य ग्रामसेवक संघाचे राज्याध्यक्ष तात्यासाहेब पाटील, सोलापूर जिल्हा ग्रामसेवक संघाचे पतसंस्थेचे चेअरमन रामभाऊ मिटकल,माढा तालुक्यातील पालवण ग्रामपंचायतीचे अतुल क्षीरसागर, माजी सरपंच परमेश्वर पाटील,
आई आशा ओहोळ, वडील परमेश्वर ओहोळ, भाऊ तेजस ओहोळ, महाराष्ट्र कंत्राटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सचिन जाधव, प्रशासन अधिकारी जहीर शेख, आपले सरकार सेवा केंद्राचे महावीर काळे उपस्थित होते.
ग्रामपंचायत विभागाचे प्रशासन अधिकारी जहीर शेख, आपले सरकारचे जिल्हा व्यवस्थापक महावीर काळे यांनी प्रस्ताव पाठविण्यासाठी प्रयत्न केले.
0 Comments