google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकिंग न्यूज ! पंढपुरातील विठ्ठल मंदिर परिसरात 'या' गोष्टीवर असणार बंदी; आदेश जारी

Breaking News

ब्रेकिंग न्यूज ! पंढपुरातील विठ्ठल मंदिर परिसरात 'या' गोष्टीवर असणार बंदी; आदेश जारी

ब्रेकिंग न्यूज ! पंढपुरातील विठ्ठल मंदिर परिसरात 'या' गोष्टीवर असणार बंदी; आदेश जारी 

चैत्र शुध्द एकादशी २ एप्रिल २०२३ ला असून, यात्रेनिमित्त पंढरपूर शहरात श्री विठ्ठल- रुक्मिणी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येतात.

वारी कालावधीमध्ये मंदीर परिसरात नारळ विक्री करण्यास व नामदेव पायरी येथे नारळ फोडण्यास मनाई असल्याचा आदेश उपविभागीय अधिकारी गजानन गुरव यांनी जारी केले आहेत.

नारळाची साल मंदीर परिसरात टाकल्याने तसेच नारळ फोडल्याने चिखल होण्याची शक्यता असल्याने घसरंती होऊन कोणत्याही प्रकारची दुर्घटना होऊ नये यासाठी फौजदारी संहितेच्या कलम १४४ अन्वये १ ते ३ एप्रिल २०२३ या कालावधीत मंदीर व मंदीर परिसरात नारळ फोडण्यास व विक्री करण्यास मनाई आहे.

तसेच शहरातील कायदा व सार्वजनीक सुव्यवस्था राखण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये १ ते ३ एप्रिल २०२३ या कालावधीत शहरात प्राणी कत्तल यावर बंदी घालण्यात आल्याचे आदेश प्रांताधिकारी गुरव यांनी पारित केले आहेत.

Post a Comment

0 Comments