google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 परिपूर्ण साहित्य संमेलन म्हणून सांगोला येथील मराठी साहित्य संमेलनाची नोंद होईल रसिक प्रेक्षकांची लक्षणीय उपस्थिती

Breaking News

परिपूर्ण साहित्य संमेलन म्हणून सांगोला येथील मराठी साहित्य संमेलनाची नोंद होईल रसिक प्रेक्षकांची लक्षणीय उपस्थिती

 परिपूर्ण साहित्य संमेलन म्हणून सांगोला येथील मराठी साहित्य संमेलनाची नोंद होईल रसिक प्रेक्षकांची लक्षणीय उपस्थिती

सांगोला (प्रतिनिधी शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज):-

सांगोला सारख्या ग्रामीण भागात साहित्य संमेलन संपन्न झाले त्यामुळे रसिक प्रेक्षकांनी गेली दोन दिवस मोठ्या संख्येनी उपस्थिती लावली होती. 

विशेषत: महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.साहित्य संमेलनातील सर्वच कार्यक्रमाचे अतिशय कोटेकोर नियोजन करण्यात आले होते.

 त्यामुळे प्रत्येक क्षेत्रातील आणि स्तरातील रसिकांची आवड लक्षात घेऊन एक परिपूर्ण साहित्य संमेलन म्हणून सांगोला येथील मराठी साहित्य संमेलनाची नोंद होईल असे बोलले जात आहे.

संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी रविवार दि. ९ एप्रिल रोजी सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत संत साहित्य व समाज परिवर्तन याविषयावर 

ह.भ.प.जयवंत बोधले महाराज यांचा परिसंवाद, सकाळी ११ ते दुपारी १ बाजता आप्पासाहेब खोत, ज्योतीराम फडतरे कथाकथन कार्यक्रम संपन्न झाला. दुपारी १ ते २ यावेळेत डॉ.कृष्णा इंगोले यांची प्रकट मुलाखत संपन्न झाली. 

दुपारी २ ते ४ यावेळेत माणदेश स्वरूप आणि साहित्य या विषयावर डॉ. अविनाश सांगोलेकर यांचे व्याख्यान संपन्न झाले. सायंकाळी ४ ते ७ यावेळेत कवी संमेलन २ मोठ्या उत्साही बातावरणात संपन्न झाले. 

सायंकाळी ७ ते १० यावेळेत महाराष्ट्राची लोकधारा व भेदिक शाहिरी कार्यक्रम संपन्न झाला. सर्व कार्यक्रमाप्रसंगी रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली होती. 

राज्यस्तरीय ग्रामीण साहित्य संमेलनामध्ये राज्यासह जिल्ह्यातील साहित्यिक व लेखकांना आपली पुस्तके ठेवता यावी या हेतूने संयोजकांच्यावतीने विशेष सुविधा करुन देण्यात आली आहे.

 काल दिवसभरात पुस्तके ग्रंथ खरेदी करण्यासाठी गर्दी दिसून आली. संमेलनासाठी येणाऱ्या रसिक प्रेक्षक, वाचकांसह तालुक्यातील नागरिकांना मोठे खाद्य उपलब्ध झाले आहे. 

सदर संमेलन यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संयोजन समितीचे अध्यक्ष श्री. बाबुराव गायकवाड,रफिक नदाफ, 

सोमेश यावलकर, डॉ.कृष्णा इंगोले, प्रबुध्दचंद्र झपके, डॉ.प्रभाकर माळी, सागर पाटील, डॉ. सयाजीराव मोकाशी, चेतनसिंह केदार, डॉ. संजीवनी केळकर, अॅड. गजानन भाकरे, प्रा. डॉ. बी.पी. रोंगे,

प्रा.धनाजी चव्हाण, डॉ.यशपाल खेडकर, खंडू सातपुते,दिलीप इंगवले, संजय नवले, दिग्विजय पाटील, सुनील जवंजाळ, संभाजी आलदर, दादासाहेब लवटे, ज्योतीराम फडतरे यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments