सांगोला माणगंगा भ्रमणसेवा संस्था व निरंकारी मंडळाच्यावतीने वाढेगांव माणनदीची स्वच्छता
माणगंगा भ्रमणसेवा संस्था व निरंकारी मंडळ शाखा सांगोला
याच्यावतीने शनिवारी माणगंगा नदीची स्वच्छता करण्यात आली.
वाढेगाव को. प. बंधारा ते त्रिवेणी संगम महादेव मंदिरापर्यंत १ किमी नदी स्वच्छ केली.नदीपात्रात असणार्या चिलार बाभळी, उपद्रवी वनस्पती, नदीतील कचरा जाळून टाकण्यात आला.
या अभियानात दोन्ही संस्थेचे सदस्य, ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या स्वच्छता अभियानानंतर सर्वांसाठी त्रिवेणी संगम येथे भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.
या अभियानास सहकार्य करणाऱ्याचा सत्कार करुन आभार मानण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी माणगंगा संस्थेचे अध्यक्ष वैजीनाथ घोंगडे, संत निरंकारी मंडळ शाखा
सांगोलाचे प्रमुख रावसाहेबसरगर, सर, माजी नगरसेवक गजानन बनकर, संजय दिघे, राहूल ऐवले, संजय बंदरे, रामचंद्र महाकाळ, दगडू जाधव, सिद्धेश्वर मेटकरी सर, दत्ता कुंभार, सुरेश पाटिल, राहुल इतापे इ. उपस्थित होते.
0 Comments