सोलापूर अनधिकृत इंग्रजी माध्यमांच्या शाळांची तपासणी होणार,
सोलापूर जिल्हा परिषदेकडून मिशन सर्च ऑपरेशन सुरू
सोलापूर शालेय शिक्षण विभागाची मान्यता नाही,
शाळा सुरू करण्याचे ना-हकरत प्रमाणपत्र व कोणत्या बोर्डाशी संलग्नित आहे,
याचे प्रमाणपत्र नसतानाही काही शाळा विशेषता इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू आहेत.
याचे प्रमाणपत्र नसतानाही काही शाळा विशेषता इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू आहेत.
या पार्श्वभूमीवर, शहरातील तीन शाळांना मनपा प्रशासनाधिकाऱ्यांनी नोटीस बजावली असून,
ग्रामीणमधील अनधिकृत इंग्रजी माध्यमांच्या शाळा तपासणीसाठी 'मिशन सर्च ऑपरेशन' सुरू झाले आहे.
ग्रामीणमधील अनधिकृत इंग्रजी माध्यमांच्या शाळा तपासणीसाठी 'मिशन सर्च ऑपरेशन' सुरू झाले आहे.
शिक्षणाधिकाऱ्यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना त्यासंबंधीचे आदेश दिले आहेत.
राज्यभरात तब्बल 800 शाळा बोगस असून त्यातील 100 शाळांना टाळे लाकण्यात आले आहे.
राज्यभरात तब्बल 800 शाळा बोगस असून त्यातील 100 शाळांना टाळे लाकण्यात आले आहे.
कोणत्याही प्रकारची मान्यता न घेताच त्या शाळा अनधिकृतपणे सुरू होत्या. अनधिकृत शाळांमध्ये बहुतेक इंग्रजी माध्यमांच्याच शाळा आहेत.
पहिल्या टप्प्यात शिक्षण विभागाने राज्य बोर्डाव्यतिरिक्त अन्य बोर्डाशी संलग्नित असलेल्या शाळांची माहिती संकलित केली आहे. आता महाराष्ट्र राज्य मंडळाच्या शाळांची माहिती घेतली जात आहे.
दरम्यान, तत्पूर्वी पालकांनी आता मुलांचा प्रकेश घेताना, ती शाळा कोणत्या बोर्डाशी संलग्नित आहे, संबंधित शाळेला शासनाची मान्यता आहे का, शाळा सुरू करताना त्यांनी शिक्षण विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र घेतलेले आहे
का, याची चौकशी करावी आणि प्रवेश निश्चित करावा; अन्यथा विद्यार्थ्यांचे नुकसान होईल, पालकांनी जागरूक राहून माहिती घ्यावी, असे आवाहन शिक्षणाधिकाऱ्यांनी केले आहे.
सध्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये मुलांना शिकविण्याचे फॅड काढल्यानेच बनावट शाळांचा सुळसुळाट सुरू असल्याचे सांगितले जात आहे. पण, मान्यतेकिना सुरू असलेल्या शाळांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे.
त्यामुळे पालकांनी प्रकेशापूर्वी शिक्षण विभागाकडील अधिकृत मान्यताप्राप्त शाळांमध्येच मुलांचा प्रवेश घ्यावा, असेही शिक्षणाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
मान्यतेसाठी 30 शाळांचे प्रस्ताव सादर
सोलापूर शहर व ग्रामीण भागात इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये मुलांना घालण्याचे फॅड काढल्यानंतर अनेकांनी स्वयंअर्थसहायिता तत्वावर अनेकांनी इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू केल्या.
त्यात काहींनी मराठी माध्यमदेखील घेतले. पण, धक्कादायक बाब म्हणजे शाळा सुरू करताना शालेय शिक्षण विभाग व संलग्नित बोर्डाची मान्यता घेणे बंधनकारक असतानाही काहींनी मान्यतेकिनाच शाळा उघडल्या आहेत.
या संबंधित शाळांचा शोध घेऊन कारवाई सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर, शहर-जिल्ह्यातील 27 ते 30 शाळांनी मान्यतेसाठी शिक्षण विभागाकडे ऑनलाइन प्रस्ताव सादर केले आहेत.
मान्यता घेताना शाळेसाठी जी जागा निश्चित केलेली आहे, संबंधित जागेत शाळा भरत नाहीत आणि ज्या शाळांना मान्यताच नाही, तरीपण सुरू आहेत, अशा शाळा नवीन शैक्षणिक वर्षात सुरू असणार नाहीत.
त्या अनुषंगाने, गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या माध्यमातून तशा शाळांचा शोध घेतला जात आहे. पालकांनीही अशा शाळांमध्ये प्रवेश घेऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करू नये.
- संजय जावीर, प्राथमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर जिल्हा परिषद.
हिदाय इंग्लिश मीडियम स्कूल (पहिली ते आठवी), इकरा इस्लामिक इंग्लिश मीडियम स्कूल (पहिली ते आठवी), जोडभावी पेठ आणि इकरा इंग्लिश मीडियम स्कूल (पहिली ते पाचवी), नई जिंदगी या शाळांना महापालिकेच्या प्रशासनाधिकाऱ्यांनी नोटीस बजावली आहे.
या शाळांना मान्यता नाही. तरीदेखील त्या शाळा काही वर्षांपासून सुरू असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांना नोटीस काढून शाळा बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
- हनुमंत जाधवर, प्रशासनाधिकारी, सोलापूर मनपा.


0 Comments