Breaking News

सांगोला तालुक्यातील पाणीपुरवठा योजनेची दुरावस्था..

   सांगोला तालुक्यातील पाणीपुरवठा योजनेची दुरावस्था..

सांगोला शिरभावी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेंतर्गत २८ गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या मानेगाव (ता. सांगोला)येथील मुख्य टँकच्या सभोवतालच्या तार कम्पाउंडची अत्यंत दुरवस्था झाली आहे. तर मुख्य टैकसह परिसर काटेरी झुडपांनी वेढला आहे.

 रात्री-अपरात्री कर्मचान्यांना मुक्कामी चांदणे मुश्किल झाले आहे. मानेगाव मुख्य टेकच्या दुरवस्थेला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारीच अबाबदार असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

 सांगोला तालुक्यातील ८२ गावांसाठी वरदायिनी असलेल्या शिरभावी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेंतर्गत मानेगाव येथे मुख्य टैंक आहे..

येथून मानेगावसह कोळा हातीद जुनोनी, सोनंद डोंगरगाव,जवळा यासह २८ गावांना पाणीपुरवठा केला जातो. 

ग्रामीण पाणीपुरवठा अधिकारी ग्रामपंचायतीने सुरुवातीला सर्व काही सुरळीत चालले होते, परंतु कालांतराने कम्पाउंडच्या तारा तुटत गेल्या पंप हाउसच्या शटरची दुरवस्था झाली,

 मुख्य टॅकसह परिसराला काटेरी झाल्याचे दिसून येत आहे. गेली दोन-तीन वर्षे ग्रामपंचायतीच्या मागणीअभावी योजना बंदच होती. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडे अशा कामांसाठी निधीची तरतूद होत नाही. 

आता नवीन कामे चालू आहेत त्यातून मानेगाव मुख्य टेकच्या दुरुस्ती देखभालीची कामेनिधीची तरतूद होत नाही. आता नवीन कामे चालू आहेत त्यातून मानेगाव मुख्य टेकच्या दुरुस्ती देखभालीची कामे पूर्ण केली जातील.

त्यामुळे मानेगाव मुख्य टैंक परिसराच्या दुरवस्थेला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप परिसरातील ग्रामस्थांनी केला आहे. 

या भागात झुडपांनी वेढले. पंप हाउसच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांना सुरक्षितता म्हणून काहीच उपाययोजना नाहीत त्यामुळे मानेगाव मुख्य टैंक परिसराची अत्यंत दुरावस्था झाली आहे.

Post a Comment

0 Comments