नागरिकांनो सावधान.. सांगोला शहर परिसरात कमाल तापमानाने चाळीशी गाठली
एप्रिल महिन्याचा उत्तरार्ध सुरू होताच सूर्याने अक्षरशःआग ओकण्यास सुरुवात केली आहे. शहर परिसरात कमाल तापमानाने चाळीशी गाठल्याचे दिसून आले. कमाल तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे.
साधारणतः मे महिन्याच्या मध्यामध्ये वाढणारा उन्हाचा चटका यंदा एप्रिलमध्येच जाणू लागल्याचे पाहायला मिळत आहे. एप्रिल महिन्यात वातावरणातील चाळीशीचा टप्पा ओलांडला आहे.
उन्हाचा कडाका वाढल्याने नागरिक दुपारी १२ वाजेनंतर बाहेर पडेनासे झाले आहेत. उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिक महत्त्वाची कामेसकाळीच उरकून घेण्यास प्राधान्य देत आहेत.
दुपारी १२ ते ४ या वेळेत उन्हाचा कडाका जास्त असल्यामुळे कालावधीत रस्ते व बाजारपेठानिर्मनुष्य होत असल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे. एप्रिल महिन्यात तापमानाने नवीन रेकॉर्ड केला आहे. अंगाची लाहीलाही होत आहे.
घराबाहेर पडल्यानंतर उन्हाचे चटके इतके तीव्र आहेत की अंग भाजून निघत आहे. गेल्या काही दिवसांपासून सूर्य आग ओकत असून उन्हाच्या वाढत्या उन्हाच्या झळा ह्या दुपारनंतरच नाही तर दिवस उजाडताच सुरुहोत आहेत.
हवामान विभागाने वर्तवलेला अंदाज अगदी तंतोतंत खरा ठरला असून सध्या सूर्य उजाडताच आग ओकतोय अशी अवस्था झाली आहे. १२१ वर्षात यंदाचा एप्रिल महिना हा ऐतिहासिक ठरलेला आहे.
उन्हाळ्याला सुरवात होताच हा महिना सर्वाधिक उष्ण ठरलेला तीव्रता वाढत असल्याने घराबाहेर नागरिक, महिला, विद्यार्थी, तरुण-तरुणी आता गॉगल, रुमाल, टोपी, स्कार्फ यांचा वापर करत असल्याचे दिसून येत आहे.
याशिवाय शीतपेय, उसाचा रस, आईस्क्रीम आणि लिंबू सरबत अशा विविध थंडपेयांची मागणीसुद्धा वाढली आहे. सूर्यपृथ्वीच्या मध्यावर, म्हणजेच विषुववृत्तावर येत असल्याने पृथ्वीवर त्याची सर्वाधिक ऊर्जा पोहोचत आहे.
त्यामुळे या दिवसांमध्ये दुपारच्यावेळी तळपत्या उन्हात बाहेर पडू नये. असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. कडक ऊन असल्याने, उष्माघाताचा झटका येण्याची शक्यता वाढते. शिवाय शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने मृत्यू ओढावण्याचीही शक्यता आहे.
अतिनील किरणांचाही सर्वाधिक त्रास या काळात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाणी जास्तीत जास्त पिण्याचा सल्ला देण्यात येत आहे. ज्यांना हृदयविकाराचा तसेच डायबेटीजचात्रास आहे, त्यांनी व्यवस्थित चेक-अप करत राहावे.
आहारामध्येही रसदार फळांचा वापर करावा असे सल्ला तज्ज्ञांनी दिला. शिवाय मे महिन्यातही अशीच अवस्था राहणार असल्याचा अंदाज आहे.
दुपारच्या वेळी उन्हाचे चटके बसत असल्याने शहरातील रस्त्यांवरील वर्दळ काही प्रमाणात कमी झाली आहे. एप्रिल महिन्यातच पारा अंशांवर ४१ अंशावर गेल्याने अंगाची लाहीलाही होत आहे.
तीव्रता वाढत असल्याने घराबाहेर पडताना नागरिक, महिला, विद्यार्थी, तरुण-तरुणी आता गॉगल, रुमाल,टोपी, स्कार्फ यांचा वापर करत असल्याचे दिसून येत आहे. याशिवाय शीतपेय, उसाचा रस, आईस्क्रीम आणि लिंबू सरबत अशा विविध थंडपेयांची मागणीसुद्धा वाढली आहे.


0 Comments