Breaking News

सांगोला तालुक्यातील महुद येथील पोक्सो व बलात्कार प्रकरणी आरोपीस जामिन मंजूर

 सांगोला तालुक्यातील महुद येथील पोक्सो व बलात्कार प्रकरणी आरोपीस जामिन मंजूर

लातुर येथे नीटच्या क्लाससाठी होस्टेलवर राहणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीशी मोबाईलवरुन संपर्क साधत एक तरुणाने तिला कारमधुन फिरायला

 म्हणून आणले व तुझ्याशी आताच लग्न करावयाचे आहे असे म्हणून एका मंदीरात तिच्या गळयात मणी मंगळसुत्र व हार घालून तिच्या इच्छेविरुध्द लग्न केले. 

आता आपण नवरा-बायको झालो असे सांगून तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला याबाबत पिडीत विद्यार्थिनीच्या वडीलांनी सांगोला पोलीस ठाण्यात दि. १०/०३/२०२३ रोजी भा.द.वि. कलम ३६६, ३७६, पोक्सो ४,८,१२,४२ अंतर्गत फिर्याद दिली होती. 

याप्रकरणी आरोपी नामे धनंजय धनाजी संजय लवटे यास सांगोला पोलीसांनी दि. १०/०३/२०२३ रोजी अटक केली होती. आरोपीने अॅड. विजय साहेबराव बेंदगुंडे यांचे मार्फत पंढरपूर जिल्हा व सत्र न्यायालयात जामिन अर्ज दाखल केला होता.

यामध्ये पंढरपूर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश तोष्णीवाल साहेब यांनी आरोपींचे वकील अॅड. विजय साहेबराव बेंदगुंडे यांचा युक्तीवाद ग्राहय धरुन दि. १२/०४/२०२३ रोजी जामिन अर्ज मंजूर केला.

आरोपीतर्फे अॅड. विजय साहेबराव बेंदगुंडे, अॅड. महेश शिंदे, अॅड. लक्ष्मण दांडगे, अॅड. तुषार शिंदे, अॅड. दिपक मदने यांनी तर सरकारी पक्षातर्फे अॅड. सारंग वांगीकर मुळ फिर्यादीतर्फे जेष्ठ विधिज्ञ धनंजय माने यांनी काम पाहिले.

Post a Comment

0 Comments