google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यातील लोणविरे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राष्ट्रवादीचे तानाजी गाडेकर यांची निवड

Breaking News

सांगोला तालुक्यातील लोणविरे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राष्ट्रवादीचे तानाजी गाडेकर यांची निवड

सांगोला तालुक्यातील लोणविरे ग्रामपंचायतीच्या

सरपंचपदी राष्ट्रवादीचे तानाजी गाडेकर यांची निवड

सांगोला : तालुका प्रतिनिधी लोणविरे ता. सांगोला ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष मा.आ.दिपकआबा साळुंखे पाटील यांचे विश्वासू 

सहकारी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक नेते तानाजी दत्तात्रय गाडेकर सर यांची निवड करण्यात आली.यावेळी कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून गुलालाची मुक्त उधळण करीत जल्लोष केला. 

लोणीविरे ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच श्री.साहेबराव यशवंत माने यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या सरपंच पदाच्या निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी

 मंडलाधिकारी विजयकुमार जाधव यांच्या अध्यक्षतेखाली व ग्रामसेवक मारकड साहेब यांच्या उपस्थितीत  रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी ग्रामपंचायत सदस्यांची सभा घेण्यात आली. 

त्यामध्ये श्री.तानाजी गाडेकर यांच्या बाजूने बहुमत झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी यांनी श्री. तानाजी गाडेकर  यांची सरपंच पदी निवड झाली असे जाहीर केले. 

यावेळी उपसरपंच सौ.मालती गायकवाड, माजी सरपंच साहेबराव यशवंत माने, ग्रामपंचायत सदस्य अशोक दोडके, 

कल्पना मोरे, संगीता गायकवाड, साधना माने ,अंबादास गायकवाड, सुमन बोराडे यांच्यासह युवक नेते सुनील पाटील, प्रवीणकुमार गायकवाड, अजित गायकवाड, तंटामुक्तीचे अध्यक्ष चंद्रकांत विक्रम माने (मेजर), 

रमेश गायकवाड,नवनाथ गायकवाड,विष्णू गायकवाड, भगवान सावंत सर, योगेश गाडेकर, आप्पासो काशीद सर, धोंडीराम माने,सुरेश माने, विलास माने सर,दत्तात्रय गाडेकर, नेताजी गाडेकर, तातोबा जगताप, आर.बी.गायकवाड 

सर,शंकर बोराडे, किसन बोराडे सर,सचिन पाटील, अमोल माने, लक्ष्मण मोरे ,नामदेव मोरे, माणिक गोडसे,माजी सरपंच रघुनाथ भजनावळे, सुहास ठोकळे, सुरेश माने,सतीश गाडेकर, समाधान गाडेकर यांचे सह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

 या निवडीनंतर महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष मा.आ. दिपकआबा साळुंखे पाटील यांनी नवनियुक्त सरपंच श्री.तानाजी गाडेकर यांचे अभिनंदन केले व गावाच्या सर्वांगीण विकासासाठी जास्तीत जास्त निधी मिळवून देऊ अशी ग्वाही देऊन भावी कार्यास शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments