सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे - एकनाथ शिंदे येणार एकत्र
राज्यात सत्तांतर झाल्यापासून उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. ठाकरे गटाकडून सातत्याने शिंदे गटावर हल्लाबोल करण्यात येत आहे.
त्यात आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात जुंपल्याचं पाहायला मिळालं. तर दुसरीकडे भाजपचे राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानामुळे खळबळ उडाली आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, हिंदुत्वाचं मोठं नुकसान करत आहेत. त्यामुळे सर्वकाही थांबलं पाहिजे. त्यात मी असा विचार व्यक्त करणं की, शिवसेना उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी एकत्र येणे, त्याची चर्चा होईल.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर महाराष्ट्रात मोठी उलथापालथ होईल, असही पाटील म्हणाले. दरम्यान अनेकजण काठावर आहेत. ते सर्वजन कोर्टाचा निकाल लागण्याची प्रतीक्षा करत आहेत, असा दावाही पाटील यांनी केला आहे.
0 Comments