google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापूर खासगी रुग्णालयांचे अडकले 'नूतनीकरण' परवाने

Breaking News

सोलापूर खासगी रुग्णालयांचे अडकले 'नूतनीकरण' परवाने

  सोलापूर खासगी रुग्णालयांचे अडकले 'नूतनीकरण' परवाने

सोलापूर : प्रत्येक तीन वर्षातून एकदा खासगी रुग्णालयांना त्यांच्याकडील परवाना नूतनीकरण करून घेणे बंधनकारक आहे. सोलापूर शहरात जवळपास ४०० रुग्णालये असून त्यातील १०० जणांनी नूतनीकरणासाठी महापालिकेकडे प्रस्ताव सादर केला.

त्यातील सुमारे ५० रुग्णालयांना अद्याप नूतनीकरण परवाना मिळालेला नाही. त्यांनी अग्निशामक व प्रदूषण नियंत्रण मंडळाची 'एनओसी' (ना हरकत प्रमाणपत्र) जोडली नसल्याची बाब समोर आली आहे.

ज्या खासगी रुग्णालयाच्या नूतनीकरण प्रमाणपत्राला तीन वर्षे पूर्ण झाली आहेत, त्यांनी ३१ मार्चपूर्वी प्रस्ताव देऊनही नूतनीकरणाचा परवाना घेणे बंधनकारक आहे. त्यानुसार सोलापूर महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे शहरातील १०० रुग्णालयांनी नूतनीकरणासाठी प्रस्ताव दाखल केले. 

पण, दोन महिन्यानंतरही परवाना मिळाला नसल्याची ओरड काहींनी 'सकाळ'कडे केली. त्यासंदर्भात महापालिकेला विचारणा केली असता, बऱ्याच रुग्णालयांनी प्रस्तावासोबत फायर व 'एमपीसीबी'चे ना हरकत प्रमाणपत्र जोडले नसल्याने त्यांना नूतनीकरण प्रमाणपत्र मिळाला नसल्याचे उत्तर अधिकाऱ्यांनी दिले.

परवाना देण्याची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक असून परिपूर्ण प्रस्ताव दिलेल्या ५० रुग्णालयांना नूतनीकरण प्रमाणपत्र मिळाले असल्याचेही आरोग्याधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, शासन निर्णयानुसार प्रत्येक रुग्णालयातील पाच बेड्‌ससाठी साडेतीन हजार रुपयांचे शुल्क आकारले जाते. 

सध्या अधिकाधिक साडेदहा हजार रुपयांपर्यंत शुल्क भरून घेतले जात आहे. सिस्टिम अपडेट झाल्यानंतर ज्या रुग्णालयातील खाटांची संख्या अधिक आहे, त्यांना पुन्हा उर्वरित शुल्क करावे लागणार आहे.

'त्या' रुग्णालयांना दंड न करण्याचा प्रस्ताव तीन वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक रुग्णालयांनी संबंधित आरोग्याधिकाऱ्यांकडून नूतनीकरण परवाना घेणे बंधनकारक आहे. त्यासाठी ३१ मार्चपूर्वी प्रस्ताव दिला, पण इतर कामांमुळे प्रमाणपत्र न मिळालेल्या रुग्णालयांना दंड आकारले जाऊ नये,

 असा प्रस्ताव सोलापूर महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांच्याकडे पाठवला आहे. जवळपास ५० रुग्णालयांचा परवाना अजून द्यायच राहिलेला आहे. 

त्या प्रस्तावातील प्रत्येक बाबींची पडताळणी केली जात आहे. त्यांना एप्रिलमध्ये परवाने मिळतील. आता महापालिका आयुक्तांच्या निर्णयाची त्या खासगी रुग्णालयांना प्रतीक्षा आहे.

नूतनीकरण परवाना घेऊन तीन वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक रुग्णालयांना पुन्हा ते प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. त्यासाठी जवळपास १०० रुग्णालयांचे प्रस्ताव प्राप्त झाले 

असून निम्म्यांना परवाना मिळाला आहे. काहींच्या प्रस्तावात त्रुटी असून अर्जासोबत अग्निशामक विभागाच्या 'फायर ऑडिट'चे प्रमाणपत्र व प्रदूषण नियंत्रण मंडळाचे 'ना हरकत' प्रमाणपत्र रुग्णालयांना देणे बंधनकारक आहे.

- डॉ. बसवराज लोहारे, आरोग्याधिकारी, सोलापूर महापालिका

Post a Comment

0 Comments