सांगोला बाजार समिती निवडणूक : मतदानाच्या एक दिवस आधी मोहन पवार यांचा उमेदवारी मागे घेत
शेतकरी विकास आघाडीला पाठींबा, बाबासाहेब देशमुख यांची मध्यस्थी
मतदानाच्या एक दिवस आधी मोहन पवार यांचा उमेदवारी मागे घेत शेतकरी विकास आघाडीला पाठींबा जाहीर केला आहे. शेतकरी कामगार पक्षाचे नेते बाबासाहेब देशमुख यांना भेटून त्यांनी आपला पाठिंब्याचे पत्र दिले आहे.
सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतदानाच्या एक दिवस आधी वाटंबरे गावातील मोहन पवार यांचा उमेदवारी मागे घेत शेतकरी विकास आघाडीला पाठींबा जाहीर केला आहे. शेतकरी कामगार पक्षाचे नेते बाबासाहेब देशमुख यांना भेटून त्यांनी आपला पाठिंब्याचे पत्र दिले आहे.
मोहन पवार यांच्या पत्रात काय ?
कृषी उत्पन्न बाजार समिती या संस्थेला संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत मी मोहन दत्तू पवार सोसायटी मतदारसंघातून (सर्वसाधारण) गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
माझ्या घरगुती कारणामुळे या निवडणुकीत माझा उमेदवारी अर्ज माघारी घ्यायचे होता, परंतु माझा उमेदवारी अर्ज वेळेच्या अभावी माघारी घेऊ शकलो नाही. त्यामुळे मतपत्रिकेमध्ये माझे नाव उमेदवार म्हणून असणार आहे.
मी मोहन दत्तू पवार या निवडणुकीत सांगोला तालुका शेतकरी विकास आघाडीला जाहीर पाठिंबा देत आहे. तरी मतदार बंधू भगिनींनी माझ्या समोरील चिन्हावर फुलीचा शिक्का मारता
सांगोला तालुका शेतकरी विकास आघाडीच्या उमेदवाराच्या नारळ चिन्हावर खोलीचा शिक्का मारून त्यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करावे, ही नम्र विनंती.
आपला
मोहन दत्तू पवार,
वाटंबरे तालुका सांगोला जिल्हा सोलापूर


0 Comments