google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोठी बातमी..सोलापूर जिल्ह्यातील सेतू केंद्रे आजपासून बंद; नागरिकांना आवश्यक दाखले 'या' ठिकाणी मिळणार; मंगळवेढ्यातील यादी..

Breaking News

मोठी बातमी..सोलापूर जिल्ह्यातील सेतू केंद्रे आजपासून बंद; नागरिकांना आवश्यक दाखले 'या' ठिकाणी मिळणार; मंगळवेढ्यातील यादी..

 मोठी बातमी..सोलापूर जिल्ह्यातील सेतू केंद्रे आजपासून बंद;

नागरिकांना आवश्यक दाखले 'या' ठिकाणी मिळणार; मंगळवेढ्यातील यादी.. 

सोलापूर शहर व जिल्ह्यातील सेतू सुविधा केंद्र (आपले सरकार सेवा केंद्र) चालविण्यासाठी देण्यात आलेल्या ठेक्याची मुदत संपुष्टात आली आहे.

त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील व जिल्ह्यातील ९ तहसिल कार्यालयातील सेतू सुविधा केंद्र (आपले सरकार सेवा केंद्र ) आजपासून बंद करण्यात येत आहेत.

शहर व जिल्ह्यातील ग्रामीण भागात आपले सरकार सेवा केंद्र (महा ई सेवा केंद्र) स्थापन केली असून नागरिकांनी आपल्या रहिवासी संकेतस्थळावर भागात कार्यरत असलेल्या आपले सरकार सेवा केंद्र (महा ई सेवा केंद्र) यांच्या मार्फत विविध दाखले व सेवा सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

सोलापूर शहर व जिल्ह्यात कार्यरत असलेल्या आपले सरकार सेवा केंद्राची यादी सोलापूर जिल्ह्याच्या संकेतस्थळावर solapur.gov.in वर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

तसेच महाराष्ट्र माहिती व तंत्रज्ञान महामंडळ, मुंबई यांनी विकसित केलेल्या aaplesarkar. mahaonline.gov.in वर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

नागरिक महाराष्ट्र तंत्रज्ञान महामंडळ मर्या, मुंबई यांचेकडून विविध विभागांचे विविध दाखले व विविध सेवा देण्याकामी महामंडळाकडून विकसित करण्यात आलेल्या

संकेतस्थळावर aaplesarkar.mahaonline. gov.in वर स्वयंनोंदणी करून सेवांचा लाभ घेऊ शकतात अथवा महामंडळाकडून विकसित करण्यात आलेल्या मोबाईल अॅप rts maharashtra व्दारे देखील नोंदणी करून सेवा घेऊ शकतात.

आपले माहिती सरकार सेवा केंद्र व केंद्र चालक, विविध दाखले / सेवा बाबत काही तक्रार असल्यास संबंधित तहसिल कार्यालय / उपविभागीय अधिकारी कार्यालय / जिल्हाधिकारी कार्यालय (सेतू संकलन) यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

मंगळवेढा येथील नागरिकांना “या” अधिकृत केंद्रावर लाभ घेता येणार आहे.

बबन लोंढे यांचे ग्रामीण रुग्णालया जवळ तुकाई नगर येथे महा ई सेवा केंद्र, प्रांत कार्यालया जवळ वैभव जाधव यांचे, कल्याणप्रभू चौक मुदगुल यांचे तर चोखामेळा नगर येथील सचिन सांगळे यांचे सुरू असून येथे नागरिकांना सर्व दाखले काढता येणार आहेत.

Post a Comment

0 Comments