सांगोला तहसिलदार अभिजीत पाटील यांची उपजिल्हाधिकारी पदी बढती.
सांगोला (शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज) सांगोल्याचे कर्तव्यदक्ष तहसिलदार अभिजीत सावर्डे पाटील यांची उपजिल्हाधिकारी पदी पदोन्नती झाली आहे.
राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने आज तहसिलदार दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा आदेश जारी करण्यात आला आहे. त्यामध्ये तहसिलदार अभिजीत पाटील यांचा समावेश आहे.
सांगोला तालुक्यात त्यांनी तहसिलदार म्हणून उत्कृष्ट सेवा देत आहेत. अवैध वाळू उपसा,मुरुम उत्खनन, आनाधिकृत खडी क्रशर चालकांवर दंडाची केलेली कारवाई, सेतू चालकाकडून सर्व सामान्याची होणारी लूट आदि प्रश्नांवर त्यांनी उत्कृष्ठ काम केले.
त्यांच्या काळात सांगोला तालुक्यातील अनेक गावातील तलाठी कार्यालये सुसज्य आणि देखणी झाली आहेत. शासनाच्या अनेक योजना सर्व सामान्य नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी त्यांनी केलेले कार्य उलेखनिय आहे.


0 Comments