वामनराव शिंदे साहेब सामाजिक परिवर्तनाचे प्रेरणास्त्रोत होते:- ॲड विजयसिंह चव्हाण
सावित्रीबाई फुले ,वामनराव शिंदे साहेब स्मृतीदिन प्रशालेत साजरा
सांगोला (प्रतिनिधी)मानवी इतिहासात एक गोष्ट वारंवार आढळते ती म्हणजे मानवी जीवनावर मूलभूत परिणाम केलेल्या घटना व व्यक्ती या कालमानानुसार ठळक व सर्वसामान्य होत जातात .
सर्वसमावेशक व समग्र मानव समूहाला दिशा देणाऱ्या अशा घटना किंवा व्यक्ती या मानवी समूहाच्या कल्याणाच्या प्रेरणास्त्रोत बनलेल्या असतात .शिक्षणमहर्षी वामनराव शिंदेसाहेब यांचे जीवन व कार्य याच पद्धतीचे आहे.
सोलापूर जिल्हा व सांगोला तालुक्याच्या शैक्षणिक ,सामाजिक व आरोग्यविषयक बाबींचा विचार केला तर त्यांचे योगदान ठळक जाणवते. असे प्रतिपादन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्येष्ठविधीज्ञ विजयसिंह चव्हाण यांनी स्मृतिदिन समारंभ कार्यक्रमात मार्गदर्शन करताना केले.
वामनराव शिंदे साहेब आदर्श विद्यालयात सावित्रीबाई फुले ,वामनराव शिंदे साहेब स्मृतिदिन समारंभ आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अजिंक्यतारा पतसंस्थेचे चेअरमन गिरीशभाऊनष्टे,संस्थाध्यक्षा .श्रीमती कौशल्यादेवी शिंदे मॅडम ,सचिव नीलकंठ शिंदे, विलास पाटील सर ,
विठ्ठलपंत शिंदे सर, सजाबाई पवार उपस्थित होते. सुरुवातीस क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, संस्थापक वामनराव शिंदे साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन उद्योगपती गिरीशभाऊ नष्टे, विजयसिंह चव्हाण पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी अजिंक्यतारा पतसंस्थेच्या चेअरमनपदी गिरीशभाऊ नष्टे ,ज्येष्ठविधीज्ञ विजयसिंह चव्हाण (संचालक )पुनश्च बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार मुख्याध्यापक रमेश पवार सर यांनी शाल, श्रीफळ देऊन केला .या 30व्या पुण्यतिथीनिमित्त प्रशालेतील अनेक विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त करून संस्थापक शिंदे साहेब यांना आदरांजली वाहिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष कुंभार सर, प्रास्ताविक मुख्याध्यापक रमेश पवार सर यांनी केले. कार्यक्रमाची सांगता विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून करण्यात आली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
0 Comments