google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 महाराष्ट्र हादरला ! सूनेच्या मासिक पाळीचं रक्त अघोरी विद्येसाठी मांत्रिकाला विकलं; सासू-दिराचं लाजिरवाणं कृत्य

Breaking News

महाराष्ट्र हादरला ! सूनेच्या मासिक पाळीचं रक्त अघोरी विद्येसाठी मांत्रिकाला विकलं; सासू-दिराचं लाजिरवाणं कृत्य

 महाराष्ट्र हादरला ! सूनेच्या मासिक पाळीचं रक्त अघोरी विद्येसाठी मांत्रिकाला विकलं; सासू-दिराचं लाजिरवाणं कृत्य

बीड :-पुरोगामी महाराष्ट्राला हादरवणारी बातमी समोर आली आहे. बीडमधून एक किळसवाणा प्रकार उघडकीस आला आहे. सासू आणि दिराने आपल्या सुनेच्या मासिक पाळीचं रक्त अघोरी विद्येसाठी मांत्रिकाला विकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पुण्यातील विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात 27 वर्षीय पीडितेच्या तक्रारीनंतर सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सदर प्रकार ऑगस्ट 2022 मधील असल्याचं तक्रारदार महिलेनं सांगितलं आहे. आपण बीडला सासरी गेलो असताना सासू आणि दिराने आपल्यासोबत हा घाणेरडा प्रकार करून हे मासिक पाळीचं रक्त कापसाने टिपून एका बाटलीत जमा केलं आणि ते मांत्रिकाला 50 हजारांना विकल्याचं पीडितेने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.

आरोपींविरुद्ध महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अघोरी प्रथा जादूटोणा प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपासासाठी बीड पोलिसांकडे ही केस वर्ग केली आहे. 

विवाहानंतर ही महिला बीड जिल्ह्यातील कामखेडा गावात पतीच्या घरी राहत होती. २६ जून २०१९ पासून तिचा पतीसह नातेवाईकांकडून शारीरिक आणि मानसिक छळ सुरू होता.

मनिषा कायंदे अधिवेशनात उपस्थित केला मुद्दा

आमदार मनिषा कायंदे या घटनेबाबत विधानपरिषदेत आवाज उठवला. पुण्यात विश्रामवाडी येथे महिलेच्या मासिक पाळीचे रक्त ५० हजार रुपयांना तांत्रिकाला विकल्याचा प्रकार माध्यमांच्या माध्यमातून आमच्या समोर आला आहे. 

हा नवीनच प्रकार समोर आला असून यात अटक झालेली आहे. अशा मांत्रिकांच्या टोळीवर गृह विभागाकडून गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली. या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून उचीत कारवाई करू, असं आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Post a Comment

0 Comments