केदार हॉस्पिटल येथे १३ व १४ मार्च रोजी भव्य मोफत आरोग्य व रक्त तपासणी शिबिर
सांगोला शहरातील वासुद रोड येथील केदार हॉस्पिटल येथे तज्ञ डॉक्टरांच्या मार्फत मोफत आरोग्य तपासणी व रक्त तपासणी शिबिराचे आयोजन सोमवार व मंगळावर १३ -१४ मार्च रोजी सकाळी ठीक १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत केले आहे.
या शिबिरामध्ये हृदयरोग, मधुमेह,उच्चरक्तदाब,दमा, थायरॉईड, किडनीचे आजार,पोटाचे विकार,छातीचे आजार, मूळव्याध, मुतखडा, संधीगतवात, मणक्याचे आजार,स्थूलता ,स्त्रियांचे सर्व प्रकारचे आजार,मासिक पाळीच्या समस्या,स्त्री-पुरुष वंध्यत्व इ. प्रकारच्या आजारांवर मोफत तपासणी केली जाणार आहे.
तसेच हृदयाची तपासणी इ.सी.जी. रक्ततपासणी,हिमोग्लोबिन,ब्लडशुगर, रक्तगट, रक्तातील कॅल्शियम चे प्रमाण यांची मोफत तपासणी आणि तज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे.तरी सांगोला पंचक्रोशीतील सर्व नागरिकांनी व ग्रामस्थांनी याचा लाभ घ्यावा
असे आवाहन हॉस्पिटलचे डॉ. निरंजन आनंदराव केदार (एम.डी. मेडिसिन) आणि स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.दिव्यता केदार (एम.एस.) यांनी केले आहे.हॉस्पिटल पत्ता-केदार हॉस्पिटल, वासुद रोड, दत्तनगर जवळ, सांगोला.मोबाइल ८०१०५५११०८*
0 Comments