मोठी घडामोड! राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची नियुक्ती?
शिवसेनेतून बंडाळी करत एकनाथ शिंदे यांनी राजकीय भूकंप घडविला होता. या राजकीय नाट्यनंतर राज्यातील ठाकरे सरकार कोसळून शिंदे सरकार प्रस्तापित झाले. त्यातच आता राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची नियुक्ती झाली आहे की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
याबाबत राष्ट्रवादीनेच या नियुक्तीबाबत मोठी व गंभीर चूक समोर आणली आहे. वास्तविक राष्ट्रवादी काँग्रेसने विधान परिषदेच्या गटनेतेपदी एकनाथ खडसे यांची नियुक्त केली आहे. परंतु त्या ऐवजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नियुक्ती केल्याचे पत्र अलिकडेच निघाले आहे.
यावरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे. विधान परीषदेच्या गटनेतेपदी एकनाथ खडसे यांचे नाव आम्ही सुचविले आहे. मात्र महाराष्ट्र विधान या पदावर एकनाथ शिंदे यांची नियुक्ती करून सर्वांनाच धक्का दिला आहे.
विशेष म्हणजे ही चूक अजूनही विधिमंडळाच्या वेबसाईटवर दिसून येत असल्याचे पाटील यांनी निर्दनास आणून दिले. याबाबत सखोल माहिती घेऊन योग्य ती कारवाई करू, असे आश्वासन विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले आहे. मात्र या प्रशासकीय गोंधळाची सध्या चर्चा सुरू आहे.


0 Comments