Breaking News

सोलापूर जिल्ह्यातील घटना... तुुला टॉपची हिरॉईन व्हायचे असेल तर हे करावेच लागेल !

सोलापूर जिल्ह्यातील घटना... तुुला टॉपची हिरॉईन व्हायचे असेल तर हे करावेच लागेल !

बार्शी : तुला टॉपची हिरॉईन व्हायचे असेल तर तुला हे सगळे करावेच लागेल…तुला मी माझ्या सिनेमात मेन रोल देतो, असे अमिष दाखवत दिग्दर्शकाने एका तरूणीवर सलग सहा महिने बलात्कार केल्याची घटना बार्शी तालुक्यातील उक्कडगाव परिसरात घडली आहे.

 या घटनेने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली असून पांगरी पोलीस स्टेशनला या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा दिग्दर्शक अहमदनगर येथील असून त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

संजय उत्तमराव पाटील असे या दिग्दर्शकाचे नाव असून त्याचे वय ५० वर्षे आहे. भाऊचा धक्का नावाचा चित्रपट तो दिग्दर्शित करणार असल्याचे त्याने या कलाकारांना सांगितले होते.

 यासाठी एका कार्यशाळेचे आयोजन सप्टेंबर महिन्यात त्याने केले होते. यासाठी येडशीचा परिसर त्याने निवडला होता. उक्कडगाव येथील डॉ. चंद्रभान सोनवणे कनिष्ठ महाविद्यालयाच्या इमारतीमध्ये या सर्व कलाकारांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

येथे राहत असतानाच त्याने या तरूणीशी (मुळची सोलापूर जिल्ह्यातील माढा गावची आणि सध्या पालघर जिल्ह्यातील नालासोपारा येथे राहत असलेली) सलगी वाढविली.

 त्याने या तरूणीला एके दिवशी आपल्या रूममध्ये बोलावले आणि तिला तुला मी टॉपची हिरॉईन बनवतो. तुला माझ्या सिनेमात मेन रोल देतो, असे आमिष दाखवत बलात्कार केला. तुला सिनेमात काम हवे असेल तर तुला हे सगळे करावेच लागेल, असेही त्याने तिला बजावले.

या तरूणीने त्याच्या विरोधात त्याचवेळी तक्रार करण्याची तयारी केली होती. परंतु जर तक्रार केली तर आपल्याला सिनेमातून काढून टाकण्यात येईल, या भीतीने तिने त्यावेळी तक्रार केली नाही.

 परंतु तिच्या असाह्यतेचा फायदा घेत वारंवार संजय पाटील याच्याकडून त्रास होऊ लागल्याने अखेर तिने पांगरी पोलीस स्टेशनला जावून आपल्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला असल्याची तक्रार दिली आहे. पांगरी पोलीसात संजय पाटील याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक जायपत्रे करत आहेत.

Post a Comment

0 Comments