सांगोला तलाठी संघ जुनी पेन्शन योजना लागु करणेबाबत. १४ मार्चपासून बेमुदत संप..
महाराष्ट्र शासनाने माहे नोव्हेंबर 2005 व त्यानंतर सेवेत रुजू झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना बंद केलेली आहे.
सदर कालावधीनंतर रुजू झालेले सर्व नवीन कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून विविध स्तरावर निवेदन मोर्चे, आंदोलन करूनही
राज्य शासन कर्मचाऱ्यांच्या सदर मागणीवर सहानुभूतीपूर्वक विचार न करता आजपर्यंत कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही. त्याची निषेधार्थ राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेणे दिनांक 14/03/2023 पासून बेमुदत संप पुकारलेला आहे.
महाराष्ट्र राज्य तलाठी संघ हा राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेशी सलग्न असल्याने तसेच महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे बहुतांश सभासद हे राज 2005 नंतर सेवेत आलेले असल्यामुळे व कोणत्याही परिस्थितीत जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे.
ही राज्य संपाची भूमिका असल्याने राज्य सरकारी मध्यवती कर्मचारी संघटनेचे पुकारलेल्या दिनांक 14/03/2013 पासूनचे संपात सांगोला तालुका तलाठी संघ येथील तलाठी, मंडळ अधिकारी, तलाठी संवर्गातील अव्वल कारकून, नायब तहसीलदार हे 100% सहभागी आहेत. माहितीस्तव विद्योद- सादर असे.


0 Comments