सांगोला राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुर्णकृती पुतळयाच्या चबुतऱ्यासाठी व स्मारकासाठी जागा मिळणेबाबत आंदोलन..
व्यापारी संकुल न होणेबाबत... सांगोला तहसील समोर लाक्षणीक उपोषण व आंदोलन
सांगोला:- शासनाच्या सन २०२२-२३ मधील विविरण पत्रामध्ये २२ डिसेंबर २०२२ रोजी मंजुर झालेल्या अ.क्र. २ मधील राजमाता अहिल्यादेवी होळकर सभागृहा समोरील बाजुस व्यापारी संकुल बांधणे हे काम २.३० लक्ष एवढे रकमेचे असुन तो खर्च व्यापारी संकुल न बांधता तो निधी व रक्कम अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारक सुशोभिकरण खर्च करणेकामी
सांगीला न.पा. जिल्हा सोलापूर करिता रक्कम रुपये ५.८० लक्ष एकता निधी दि. २२ सप्टेंबर २०२२ रोजी सांगोला नगरपरिषदेसाठी मंजूर झालेला आहे.
तो निधी एकूण तीन कामासाठी मंजुर झाला असून तो निधी सध्या मा. जिल्हाधिकारी व त्यांचे कार्यालयकडे उपलब्ध झालेला आहे. तरी त्या एकूण तीन कामामधील अ.क्र. २ चे विकास, काम हे राजमाता अहिल्यादेवी होळकर सभागृहासमोरील बाजूस व्यापारी संकुल बांधणे हे काम आहे. हे काम एकूण निधी पैकी हे काम २.३० लक्ष एवढया रकमेचे आहे.
परंतु तो निधी त्याठिकाणी व्यापारी संकुल बांधण्यास खर्च केल्या व त्याठिकाणी व्यापारी संकुल उभे राहिल्यास सद्यस्थितीला त्याठिकाणी असलेला पुण्यश्लोक राजामाता अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा झाकला जाणार आहे.
व स्मारक देखील झाकले जाणार आहे. असे झाल्यास सांगोला वासीय इतिहास पुसण्याचे साक्षीदार होणार आहेत. तरी हे व्यापारी संकुल त्या ठिकाणी उभे राहिले तर भविष्यात सध्यठिकाणी असलेल्या स्मारकामध्ये अनेक प्रकारचे गैरकृत्य घडणार आहेत.
तरी त्यामुळे तमाम अहिल्यादेवी प्रेमीच्या वतीने विनंती करतो को राजमाता अहिल्यादेवी होळकर सभागृहासमोर व बाजूस व्यापारी संकुल बांधकाम करु नये व त्याठिकाणी अहिल्यादेवी होळकर सभागृहाच्या प्रांगणामध्ये
राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा पुर्णकृती पुतळयाच्या चबुत-यासाठी व स्मारकासाठी जागा व निधी मंजुर करावा या मागणीसाठी दि.१३ मार्च २०२३ वार सोमवार दिवशी तमाम अहिल्याप्रेमीच्या वतीने सांगोला तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणीक उपोषण /आंदोलन करीत आहे


0 Comments